पालकमंत्रिपदाची यादी जाहीर ! शिवसेनेच्या ‘वाघा’कडे ‘या’ 2 जिल्ह्याची जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचं सरकार झाल्यान झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप झालं. आता पालकमंत्रिपदाची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरे यांची देखील पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्हयाचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

पालकमंत्रिपदाची यादी

1. पुणे – अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर – अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर – आदित्य उध्दव ठाकरे
4. ठाणे – एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड – आदिती सुनील तटकरे
6. रत्नागिरी – अनिल दत्तात्रय परब
7. सिधुदुर्ग – उदय रविंद्र सामंत
8. पालघर – दादाजी दगडू भुसे
9. नाशिक – छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे – अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार – अ‍ॅड. के.सी. पाडवी
12. जळगाव – गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर – हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा – शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली – जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर – दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद – सुभाष राजाराम देसाई
19. जालना – राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी – नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली – वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड – धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड – अशोक शंकरराव चव्हाण.
24. उस्मानाबाद – शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर – अमित विलासराव देशमुख
26. अमरावती – अ‍ॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला – ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम – शंभुराजे शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ – संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा – सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा – सतेश उर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया – अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर – विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली – एकनाथ संभाजी शिंदे