राज्यातील ८ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील आठ जिल्ह्यासाठी नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे आदेश एका शासन निर्णयाद्वारे काढण्यात आले आहेत. राज्याचे उद्योग मंत्री अतुल सावे यांची हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप कांबळे यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यामुळे हिंगोलीचे पालकमंत्री पद २४ दिवस रिक्त होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्रीमंडळ विस्तारात फडणवीस सरकारने सहा मंत्र्यांना वगळण्यात आले होते. दरम्यान विधिमंडळाचे अधिवेश संपल्यावर राज्य शासनाने नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहिर करण्यात आलेल्या नव्या यादीनुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आता वर्ध्याऐवजी चंद्रपूर सोबतच गडचिरोलीचे पालकमंत्री राहणार आहेत. लवकरच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने काही महिन्यांचा कालावधी नव्या पालकमंत्र्यांना मिळणार आहे.

अमरावती – डॉ. अनिल बोंडे
पालघर – रविंद्र चव्हाण
भंडारा – डॉ. परिणय फुंके
गोंदिया – डॉ. परिणय फुंके
हिंगोली – अतुल सावे
वर्धा- चंद्रशेखर बानकुळे
बुलढाणा – डॉ. संजय कुटे
गडचिरोली – सुधीर मुनगंटीवार

पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

…तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल