पाकिस्तानसह ‘हे’ 11 देश जगात सर्वात धोकादायक, जाणून घ्या यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : ग्लोबल पीस इंडेक्स २०१९ ने जगातील सर्वात धोकादायक देशांची यादी जाहीर केली आहे. या देशांमधील परिस्थिती व सुरक्षितता ८ मानकांद्वारे मोजली आहे. या यादीत सर्वात सुरक्षित आणि सुखी देश आइसलँड तर अफगाणिस्तान सर्वात धोकादायक देश ठरला आहे. जाणून घेऊयात जगातील सर्वात धोकादायक अशा ११ देशांबद्दल जिथे मानवी जीवन खूप स्वस्त आहे.

१.अफगाणिस्तान:
सर्वात धोकादायक देशांच्या यादीत पहिले नाव अफगाणिस्तानचे आहे. तेथील तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांमुळे परिस्थिती खूपच वाईट आहे. सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात अत्यंत घटक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

२. सिरिया :
अहवालानुसार सिरिया हा दुसरा सर्वात धोकादायक देश आहे. गृहयुद्ध, इसिस आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे तेथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इसिस मुले देश गुन्हेगारीसाठी बदनाम झाला आहे.

३. दक्षिण सुदान :
या देशाचे चे नाव यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे राजकीय आणि वांशिक संघर्षांमुळे बर्‍याच प्रमाणात विनाश झाले आहेत. या देशात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे.

४. येमेन :
या अहवालानुसार येमेनचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. हिंसा, रोग आणि दहशतवादाने ग्रस्त या देशाची परिस्थिती चांगली नाही.

५. इराक:
सर्वात धोकादायक देशांमध्ये इराक पाचव्या क्रमांकावर आहे. तेथे दहशतवाद आणि लष्करी संघर्ष अत्यंत टोकाच्या पातळीवर आहे.

६. सोमालिया:
घटक देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकाबद्दल बोलताना सोमालियाचे नाव येते. हा देश दहशतवाद आणि लष्करी संघर्षाने झटत असलेला देश आहे.

७.मध्य आफ्रिकन रिपब्लिक :
सर्वात धोकादायक देशांच्या यादीत मध्य आफ्रिकन रिपब्लिक सातव्या क्रमांकावर आहे. हा देश राजकीय, आरोग्य समस्या आणि गृहयुद्धाशी झगडत आहे.

८. लिबिया :
या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर लिबियाचे नाव आहे. वाढती गुन्हेगारी, गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे येथे बर्‍याच प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे.

९. रिपब्लिक ऑफ कॉंगो :
नवव्या स्थानावर रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे. भूस्खलन, पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे येथे बरीच नासाडी झाली आहेत सातत्याने आपत्कालीन परिस्थितीशी नागरिकांना सामना करावा लागतो.

१०. रशिया :
हा देश दहाव्या क्रमांकावर आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अतिशय सामर्थ्यवान मानला जाणारा हा देश सुरक्षा, अंतर्गत संघर्ष आणि राजकीय दहशतवादाशी झगडत आहे.

११. पाकिस्तान :
ग्लोबल पीस इंडेक्स २०१९ च्या या यादीत पाकिस्तान ११ व्या क्रमांकाचा धोकादायक देश ठरला आहे. अस्थिर राज्यव्यवस्था आणि दहशतवादाचा वाढता प्रभाव या कारणांमुळे येथील लोकांना सातत्याने धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

Visit : Policenama.com