चिमुकलीनं केली Google ची मदत, हटवले कोट्यावधींची कमाई करणारे स्कॅम Apps !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेलवेयर इंफेक्टेड असलेले 17 धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहेत. आता गुगलवर हे 17 अ‍ॅप्स उपलब्ध नाहीत. गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरवर उपलब्ध असलेले अनेक अ‍ॅप्स सिक्योरिटी चेकमधून जात आहेत. असं असलं तरी स्कॅमर अनेक अ‍ॅप्सच्या मदतीनं युजर्सना नुकसान पोहोचवतं. प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरवरून 24 लाखांहून जास्त डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सची माहिती उघड झाली आहे. हे लहान मुलांना लक्ष्य करत होते. खास बात अशी की, स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका चिमुकलीनं सिक्योरिटी रिसर्चची मदत केली आहे. सर्च इंजिन कंपनीन हे अ‍ॅप्स हटवले आहेत.

चेक रिपब्लिकच्या प्रोग्राममध्ये राहणाऱ्या छोट्या युजरनं 7 अ‍ॅप्सची माहिती उघड करून गुगलला मोठी मदत केली आहे. अटॅकर्सनं स्कॅम करून 5,00,000 डॉलर (जवळपास 3.7 कोटी रुपये) कमावले होते. Senson Tower कडून हे डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. अशा एकूण 7 अ‍ॅप्सची माहिती समोर आली आहे जे अ‍ॅडवेयर स्कॅमच्या मदतीनं युजर्सला नुकसान पोहोचवून कमाई करत होते. हे अ‍ॅप्स एंटरटेंमेंट, वॉलपेपर आणि म्युझिक अ‍ॅप्सच्या स्वरूपात युजर्सना जाहिरात दाखवत होते. खास करून ते लहान मुलांना टार्गेट करत होते.

चेक रिपब्लिक अवास्टकडून Be Safe Online Project चालवण्यात आले. यात लहान मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसं रहावं हे सांगितलं जात होतं. अशात एका मुलीनं या स्कॅम अ‍ॅप्सपैकी एकाला टिकटॉक प्रोफाईलवर प्रमोट केलं जात असल्याचं रिपोर्ट केलं. यानंतर हे पूर्ण प्रकरण समोर आलं आणि धोकादायक अ‍ॅप्सला हटवण्यात आलं. या अ‍ॅप्सला इंस्टा आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट केलं जात होतं. युजर्सच्या डिव्हाईसमध्ये जाऊन ते त्यांना नुकसान पोहोचवत होते.

अ‍ॅप्सबाबत माहिती मिळताच गुगल आणि अ‍ॅपल दोघांनाही अलर्ट करण्यात आलं. या अ‍ॅप्सना प्ले स्टोरवरून हटवलं आहे. हे अ‍ॅप्स खूप साऱ्या जाहिराती दाखवून युजर्सला 2 डॉलर ते 10 डॉलर दरम्यान पैसे चार्ज करत होते.