‘हम निभाऐंगे !’ घोषणेसह काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

 शेतकरी आणि रोजगाराच्या मुद्द्यासह इतर अनेक मोठ्या घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. हम निभाऐंगे अशी या जाहीरनाम्याची नवी घोषणा आहे. या जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी सोनिया गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला, प्रियंका गांधी. पी चिदंबरम, एच डी देवेगौडा आदी दिग्गज नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

या जाहीरनाम्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
– प्रत्येक गरिब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देणार
– १० लाख बेरोजगार तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार
– शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणआर
– अर्थव्यवस्था सुरळीत करून जीडीपीच्या ६ टक्के पैसा हा शिक्षणासाठी वापरणार
– शेती कर्ज थकलं नाही तर फौजदारी गुन्हा नाही
– ६ महिन्यांमध्ये २२ लाख नोकऱ्या निर्माण करू