दुर्देवी ! COVID-19 हॉस्पीटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 5 ‘कोरोना’बाधितांचा होरपळून मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बांगलादेशमध्ये मात्र एक भयंकर घटना घडली आहे. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास कोरोनाबाधित रुग्णालयालाच आग लागल्यामुळे 5 कोरोनाबाधितांच्या मृत्यू झाला. यात एक महिलेचाही समावेश होता. ही आग बांगलादेशमधील प्रसिद्ध गुलशन मार्केट परिसरात लागली.

आग एवढी भीषण होती की रुग्णालयातील बेड्स जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात 4 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. आग गुलशन परिसरातील कोरोना आयसोलेशन युनीट रुग्णालयाच्या तळ मजल्याला लागली. एसीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीची भीषणता एवढी होती की, सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे रुग्णांना बाहेर काढणे कठिण झाले होते.

मात्र तरी तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर इतर रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या इतर रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या आगीच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अग्निशमन दलाच्या ए दिलेल्या माहितीत, ही आग रुग्णालयात सुरक्षेचा अभाव असल्यामुळे पसरली. अद्याप किती रुग्ण जखमी आहेत, यांची माहिती मिळालेली नाही आहे. बांगलादेशमध्ये कोरोनाचा कहर सुरुच असून आतापर्यंत 38 हजार 292 लोकांना लागण झाली आहे. तर, 544 लोकांचा मृत्यू झाला आहे.