चमत्कार ! डॉक्टरनं रूग्णाला 2 तासासाठी ‘मारलं’, उपचारानंतर पुन्हा ‘जिवंत’ केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर कुणी गंभीररित्या जखमी झाले किंवा हृदयविकाराचा झटका आला किंवा डोक्याला गंभीर इजा झाली असेल तर चिंता करण्याची काहीही एक गरज नाही. कारण, तुम्ही मेल्यानंतरही जिवंत होऊ शकता असा दावा अमेरिकेच्या डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टर रुग्णाला मारून म्हणजेच मृत अवस्थेत रुग्णावर उपचार करतील. डॉक्टरांनी १० लोकांवर असे परीक्षण केले असून त्यात ते सफल झाले आहेत.

कुठे झाली ही आश्चर्यकारक चाचणी?
अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरातील यूनिव्हर्सिटी ऑफ मैरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसिन सेंटर च्या डॉक्टरांनी ही आश्चर्यकारक चाचणी केली.

कुणी केली मेडिकल टेस्ट?
यूनिव्हर्सिटी ऑफ मैरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसिन सेंटर चे डॉक्टर सॅम्युएल टिशरमन आणि त्यांच्या सर्जिकल टीम ने ही टेस्ट केली.

रुग्णास मारून जिवंत करण्याचा नेमका हेतू काय होता?
डॉक्टर सॅम्युएल टिशरमन यांच्या मते जर रुग्ण गंभीर अवस्थेत असेल तर सर्जरी करताना तो मृत पावण्याची शक्यता जास्त असते. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांना वेळ कमी मिळतो त्यामुळे रुग्णाला त्या अवस्थेत डॉक्टरांनी जर मुर्दा बनवले तर त्यांना रुग्णाला ठीक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

डॉक्टरांच्या टीमने कोणती पद्धत अवलंबली?
यूनिव्हर्सिटी ऑफ मैरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसिन सेंटरचे डॉक्टर सॅम्युएल टिशरमन यांनी माणसाला मृत करून पुन्हा जिवंत करण्याची जी पद्धत अवलंबली त्या पद्धतीचे नाव आहे – इमरजेंसी प्रिझरव्हेशन अ‍ॅंड रीससिटेशन (EPR).

असा उपचार करण्याची गरज का पडली?
डॉक्टर सॅम्युएल टिशरमन यांच्याकडे एका दिवशी एक निरोगी युवक आला त्याच्या हृदयावर कुणीतरी चाकू खोपसला होता. त्यास तातडीने उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्या दरम्यान त्याचे निधन झाले.

डॉक्टरांना ही प्रेरणा कुठून मिळाली?
एका दिवशी डॉक्टर सॅम्युएल टिशरमन यांनी वाचले की गंभीर पणे जखमी अवस्थेत असणाऱ्या डुकराला तीन तासासाठी मारण्यात आले आणि उपचार झाल्यानंतर त्याला जिवंत करण्यात आले. तेव्हा त्यांनी विचार केला की हे माणसांमध्ये देखील होऊ शकते.

डॉक्टरांच्या टीमने नंतर काय केले?
EPR तंत्रानुसार गंभीर स्वरूपात जखमी असलेल्या माणसाला १० ते १५ डिग्री सेल्सियस वर ठेवले जाते. संपूर्ण शरीराचे रक्त थंड पाण्याने बदलल्यानंतर शरीरातील रक्ताला सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे मेंदू मधून होणारी विचारप्रक्रिया हि बंद होते आणि मेंदूचे काम करणे बंद होते. अशा वेळेस जखमी माणूस मृत अवस्थेत असतो.

उपचार झाल्यानंतर शरीरात रक्ताचा पुरवठा केला जातो
डॉक्टर टिशरमन यांनी ही पद्धत अवलंबली. त्यांनी आपल्या १० लोकांची टीम घेऊन हे परीक्षण केले. दोन तासाच्या उपचारानंतर डॉक्टर टिशरमन यांनी रुग्णाच्या शरीराला पुन्हा ३७ डिग्री सेल्सियस तापमानावर आणले आणि शरीरात रक्ताचा प्रवाह सुरु केला.

उष्णता मिळाल्यास शरीराने पुन्हा आपले काम चालू केले
जेव्हा शरीराला सामान्य तापमान मिळाले तर शरीराने आपले काम चालू केले. हृदयाची धडधड सुरु झाली आणि रक्त मेंदूपर्यंत पोहचू लागले. हळू हळू सर्व शरीर साधारण स्थितीत आले.

अमेरिकेच्या प्रशासनाने परीक्षणासाठी दिली होती परवानगी
अमेरिकेतील संस्था यूएस फूड अ‍ॅंड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ने डॉ. सॅम्युएल टिशरमन यांना परीक्षणासाठी परवानगी दिली होती. हे परीक्षण अजूनही चालूच आहे. डॉक्टर सम्युएल यांनी सांगितले की, २०२० संपेपर्यंत या सगळ्या परीक्षणाचे परिणाम सांगितले जातील.

Visit : Policenama.com