माहितीय का ? जाणून घ्या, ‘या’ वस्तूंवर ‘शून्य’ टक्के ‘GST’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वस्तू आणि सेवा करात कराची टक्केवारी वेगवेगळी असल्याने अजूनही लोक याबाबत संभ्रमात आहेत की कोणत्या वस्तूंवर कर आहे आणि कोणत्या नाही, कारण सरकारने जीएसटीचे बिल आणताना संगितले होते की जीएसटी लागू झाल्यावर सामान्य लोकांचे जीवन आधिक सुसाह्य होईल आणि गरजेच्या वस्तूंवरचे कर कमी होईल. आता वस्तू आणि सेवा कराच्या कौन्सिलची 35 वी बैठक पार पडली. पण अशा काही वस्तू आणि सेवा आहे त्यांना जीएसटी कर भरावाच लागत नाही.

संगीताच्या संबंधित पुस्तकांवर आणि फ्रोजन भाज्यांवर शून्य टक्के टॅक्स आहे. तर सध्या जीएसटीमध्ये 4 टॅक्स स्लॅब आहे.

या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी –
दूध, दही, पनीर असा रोज लागणाऱ्या वस्तूंना जीएसटीतून बाहेर ठेवले आहे. ज्या वस्तू जीएसटीच्या करात नाहीत त्यात बटर मिल्क, भाज्या, फळं, ब्रेड, पॅकेजिंग नसणारे अन्नपदार्थ, गूळ, दूध, अंडी, लस्सी, पॅकेजिंग नसलेले पनीर, मैदा, बेसन, प्रसाद, काजळ, झाडू आणि मीठ याचा समावेश आहे. याशिवाय, फ्रेश मटण, चिकन, यावर देखील कोणताही जीएसटी नाही.

मुलाच्या कामाच्या वस्तू आणि न्यूज पेपर, मुलांचे ड्राइंग आणि कलरिंग बुक, एज्युकेशन सेवेमध्ये देखील जीएसटी नाही. त्याशिवाय मातीच्या मुर्ती, खादी कपडे यावर कोणताही टॅक्स लागत नाही.

आरोग्य सेवांना देखील सरकारने शून्य टक्के जीएसटी ठेवला आहे. त्यावर कोणताही टॅक्स नाही.

या वस्तू देखील शून्य टक्के कराच्या दरात आहेत. सॅनेटरी नॅपकिन, स्टोन, मार्बल, राखी, लाकडाच्या मुर्ती, हॅडिक्राफ्ट वस्तू यावर शून्य टक्के जीएसटी आहे. जीएसची कौन्सिलच्या 31 व्या बैठकीत फोजन भाज्यावरील टॅक्स देखील हटवण्यात आले आहे. या वस्तू आता शून्य टक्के दरात आणण्यात आल्या आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा “पायलेट्स एक्सरसाइज”

जाणून घ्या “योगा” कधी करावा

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

अहो आश्चर्यम ! ८४ वर्षाच्या आजी करतात ‘योगा’