Live in Relationship | पतीची वाटणी ! विवाहित तरूणाला ‘लिव्ह इन’ गर्लफ्रेंडसोबत सुद्धा करावा लागला विवाह, आता 3-3 दिवस दोघींसोबत राहणार

रामपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  यूपीच्या रामपुर (Rampur News) मधून खुपच मनोरंजक प्रकरण समोर आले आहे. येथे अगोदरच विवाहित असलेल्या तरूणाचा दुसरा विवाह (Man Second Marriage) लावून देण्यात आला. आता त्याला तीन-तीन दिवस आपल्या दोन्ही पत्नींसोबत रहावे लागेल. पूर्ण प्रकरण सोशल मीडियाद्वारे झालेल्या प्रेमाचे (Love On Social Media) आहे. सोशल मीडियावर प्रेम झाल्यानंतर तरूण आपल्या लिव्ह इन गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशन (Live In Relationship) मध्ये राहू लागला होता. या दरम्यान गर्लफ्रेंड प्रेग्नंट (Girlfriend pregnant) झाली आणि तिने मुलाला जन्म दिला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अगोदरच विवाहित असलेला हा तरूण तिला सोडून गावी पळून आला.
त्याची गर्लफ्रेंड त्याला शोधत-शोधत अखेर त्याच्या गावात पोहचली.
तरूणी तिथे पोहचताच मोठा गोंधळ झाला. सर्व प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या पत्नीला सुद्धा पतीच्या दुसर्‍या विवाहासाठी संमती द्यावी लागली. ज्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत सुद्धा विवाह केला.
इतकेच नव्हे तर दोन्ही पत्नींमध्ये पतीची वाटणी सुद्धा झाली.

तीन-तीन दिवस दोन्ही पत्नींसोबत राहणार

तरूण आता आपल्या दोन्ही पत्नी आणि आई-वडीलांसोबत सुद्धा राहिल.
तरूणांला आता आपल्या दोन्ही पत्नींसह त्यांच्या मुलांचाही सांभाळ करावा लागेल.
विभागणीच्या हिशेबाने तो सोमवार, मंगळवार आणि बुधवारी आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहील.
तर प्रेयसीसोबत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी राहिल.
रविवारी त्याला आपल्या आई-वडीलांसोबत वेळ घालवावा लागेल.

ही विचित्र घटना घटना रामपुरच्या ढोंकपुरी तांडा परिसरातील आहे.
दिड वर्षापूर्वी तरूणाची भेट आसामच्या एका मुलीसोबत फेसबुकवर झाली होती.
दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि नंतर दोघे चंडीगढमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live In Relationship) राहू लागले. या दरम्यान मुलगी प्रेग्नंट झाली.
तर मुलीला माहित होते की तो विवाहित आहे.

Web Title : Live in Relationship | man second marriage with girlfriend three three days live with both wives

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Pune Fraud News | प्लॉट विकसित करुन देण्याच्या नावाखाली 4 कोटींची फसवणूक; 30 गुंतवणुकदारांना घातला गंडा

Pune News | अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी मुलालाच इमारतीत डांबले; शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील खळबळजनक प्रकार