लग्नाचं आमिष दाखवून ठेवले शरीरसंबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत करवून घेतलं धर्मपरिवर्तन

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – यूपीच्या बागपतमध्ये लव्ह जिहादचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये असा आरोप केला जात आहे की, पूर्वीच विवाहित असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने हिंदू असल्याचे सांगून घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर तिच्याशी संबंध ठेवले.

यादरम्यान महिला गर्भवती राहिली व तिने त्या व्यक्तीला याविषयी माहिती दिली. मग तेव्हा त्याने सांगितले की, तो एक मुस्लिम आहे आणि महिलेला गर्भपात करुन धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. धर्मपरिवर्तन न केल्याने त्याने तिच्यावर अत्याचार केले, त्यानंतर तिने धर्मपरिवर्तन देखील केले. नंतर त्याने तिला सोबत राहण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर, आता तो त्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे, यामुळे त्या महिलेने पोलिसांकडे संपर्क साधला आहे.

झाले असे की, बागपत जिल्ह्यातील एका गावात घटस्फोटित महिला लव्ह जिहादची शिकार झाली आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती खासगी रुग्णालयात नर्स आहे. सुमारे एक वर्षापूर्वी, त्या महिलेची भेट बडौत कोतवाली परिसरातील कोताना गावातून एका व्यक्तीसोबत झाली, ज्याने आपले नाव अक्ष सांगितले होते.

अक्ष ने पीडित महिलेला सांगितले की, तो डॉक्टर आहे आणि तो पार्ट टाइम हरयाणवी चित्रपटातही काम करतो. तो घटस्फोटित आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे कारण त्याला एक मूल आहे ज्यासाठी त्याला आईची आवश्यकता आहे. यानंतर दोघांचे संबंध आले आणि तो हिंदू असल्याप्रमाणेच त्या महिलेबरोबर मंदिरात जायचा. दरम्यान, ही महिला गर्भवती राहिली, त्यानंतर तिने त्या व्यक्तीला यासंदर्भात माहिती दिली आणि त्याला लग्न करण्यास सांगितले. त्यानंतर, त्या व्यक्तीचे वास्तव बाहेर आले की, तो विवाहित आहे आणि दोन मुलांचा पिता आहे. त्याने घटस्फोट घेतला नाही.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, त्याला लग्नाचे विचारले असता त्या व्यक्तीने सांगितले की, ते दोघेही लग्न करू शकत नाहीत कारण तो मुस्लिम आहे आणि त्याचे नाव अक्ष नसून अक्रम कुरेशी आहे. त्याने त्या महिलेला सांगितले की, गर्भपात करुन धर्मपरिवर्तन करुन मुस्लीम धर्मात ये. पीडितेने धर्मपरिवर्तन करण्यास व गर्भपात करण्यास नकार दिला. यानंतर, अक्रम-अक्ष व्यक्तीने तिला बंदी ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरवात केली, त्यानंतर पीडित महिलेने कंटाळून धर्मपरिवर्तन केले, परंतु त्यानंतरही अक्रमने तिला आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला आणि गर्भपात करण्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली.

इतकेच नाही तर जेव्हा तो तिच्यासोबत रिलेशनमध्ये होता, तेव्हा अक्रमने तिचे काही व्हिडिओ बनवले होते जे अद्याप त्याच्याकडे आहेत आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत असे. दबाव आणून त्याने तिला जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले आणि अजूनही धमकी देत आहे की, तो तिचे व्हिडिओ व्हायरल करेल. पीडित महिलेने पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे की, ज्या व्यक्तीने 1 वर्ष तिचे शोषण केले त्यास कायद्याने शिक्षा झाली पाहिजे आणि तिला आपल्या हिंदू धर्मात परत यायचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यास सुरवात केली आहे.