Live In Relationship Rules In India | जाणून घ्या लिव्ह इन नात्याबद्दल भारतीय कायदे काय म्हणतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Live In Relationship Rules In India | लग्नाविना तरुण-तरुणीने एकत्र राहण्याची पाश्चात्य देशांमधील संस्कृती आता भारतात रुजू व्हायला लागली आहे. लग्नाशिवाय आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा प्रकार म्हणजे लिव्ह इन (Live In Relations). पण भारतात आजही अनेकजण या लिव्ह इन मधल्यांना घर भाड्याने देत नाहीत. पण, कायद्यानुसार लिव्ह इनमध्ये राहणे, हा गुन्हा नाही. सर्वोच्च न्यायालयानेदेखील अशा जोडप्यांना मान्यता दिली आहे. (Live In Relationship Rules In India)

दिल्लीत श्रद्धा वालकर आणि आफताबदेखील अशाच प्रकारे एकत्र राहत होते. मात्र, त्यांनी भाडेकरार करताना पोलिसांना पती-पत्नी असल्याचेही लिहून दिले होते. त्यामुळे कदाचित श्रद्धाला सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांना दिलेल्या अधिकारांची माहिती नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन जोडप्यांसाठी (Live In Relationship Rules In India) काही नियमही बिनविले आहेत. ज्यांचे पालन त्यांना करावे लागते. ते नियम पुढीलप्रमाणे :

पहिला म्हणजे, १८ वर्षे पूर्ण केलेले दोन लोक परस्परांच्या सहमतीने एकमेकांसोबत राहू शकतात. कायद्याने ते अधिकृत आहे, असे न्यायालयाने सांगितले आहे. अशा जोडप्यांकडे न्यायालय पारंपरिक लग्न केलेल्या जोडप्यांच्या बरोबरीला ठेवते. यासाठी त्यांना वैवाहिक नियमांचे पालन करावे लागेल. त्यांच्यातील कोणीही अल्पवयीन असल्यास या नात्याला मान्यता मिळत नाही.

लिव्ह इन नाते तेव्हाच मान्य होते, जेव्हा ते जोडपे पती-पत्नीप्रमाणे राहत असतील. यासाठी कोणत्याही प्रकारचा काळ ठरविलेला नाही, परंतु ते दोघे सतत एकमेकांसोबत राहत असावेत.
काही दिवसांसाठी एकत्र आले पुन्हा वेगळे झाले, पुन्हा एकत्र आले अशा संबंधांना लिव्ह इन मानले जाणार नाही.
तसेच लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला पत्नीप्रमाणेच सहकाऱ्याकडून पोटगी घेण्याचा अधिकार आहे.
कायदेशीर पती-पत्नी नसले तरी तिला या अधिकारापासून वंचित ठेवता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

((Live In) लिव्ह इनमध्ये असताना झालेल्या अपत्याला त्याच्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये पूर्ण अधिकार असतो.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले आणि नंतर जर लग्न केले नाही तर
तो गुन्हा मानला जातो. या स्थितीत महिला असो किंवा पुरुष त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून शिक्षा होऊ शकते.

लिव्ह इनमध्ये येण्यापूर्वी जर पुरुष किंवा महिला विवाहित असेल तरी दुसऱ्या १८ वर्षे पूर्ण झालेल्या
व्यक्तीसोबत राहणे गुन्हा होत नाही. परंतु, जर पहिल्या पती-पत्नीपासून घटस्फोट न घेता,
त्याने किंवा तिने दुसऱ्याशी लग्न केले तर हिंदू विवाह कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो.
तसेच, लिव्ह इनमध्ये राहताना जर मारहाण झाली तर एखादी महिला पोलिसांत लग्न झालेल्या महिलेप्रमाणे
घरगुती हिंसाचाऱ्याच्या अधिनियम २००५ नुसार गुन्हा दाखल करू शकते.

Web Title :- Live In Relationship Rules In India | live in relationship rules in india can you have sex without problems in a live in relationship what supreme court rules say

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत