Live In Relationship |’लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये खर्च दोघांनी करावा किंवा कुणी एकाने, हा गुन्हा नाही – हायकोर्ट

नवी दिल्ली : Live In Relationship | लिव्ह-इन रिलेशनशिप (live-in relationship) मध्ये राहणार्‍या युगलां (couple) पैकी रोजच्या गरजांसाठी कुणी एका जोडीदाराने खर्च केला किंवा दोघांनी मिळून केला, हा गुन्हा नाही. उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन (bail) देताना ही टिप्पणी केली आहे.

जस्टिस मुक्ता गुप्ता (Justice Mukta Gupta) यांनी आपल्या निर्णयात मुलीची ती बाजू पूर्णपणे फेटाळली, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की, आरोपी तरुणाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहात असताना तिच्याकडून सव्वा लाख रुपयांचा खर्च करून घेतला होता. उच्च न्यायालयाने म्हटले (High Court) की, जेव्हा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये दोघे जोडीदार एकत्र राहतात तेव्हा त्याचा अर्थ हा नाही की, खर्च केवळ एकाच जोडीदाराने करावा.

Section 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा ! जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

न्यायालयाने म्हटले की, राहण्यासाठी खर्च मुलगी करो अथवा मुलगा, किंवा दोघांनी केला, हे गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही. उच्च न्यायालयाने ही टिप्पणी करताना बलात्काराचा आरोप असलेला आरोपी (accused of rape) तरूण राहुल कुशवाहा (Rahul Kushwaha) यास जामीन दिला. न्यायालयाने आरोपीला 25 हजार रुपयांचा जात मुचलका आणि तेवढ्याच रक्कमेचा जामीन जमा करण्याच्या अटीवर जामीन दिला आहे.

जस्टिस गुप्ता यांनी आपल्या निर्णयात म्हटले की, मुलीच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की, ती आरोपी राहुलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होती आणि दोघांनी विवाहासाठी आपल्या कुटुंबियांना तयार सुद्धा केले होते. परंतु, दोघांचा विवाह का झाला नाही, याचे कारण अजूनपर्यंत सांगितले गेले नाही.

हे आहे प्रकरण

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मुलीने म्हटले होते की, सप्टेंबर 2017 मध्ये ती नोकरीच्या शोधात दिल्लीत आली होती. येथे तिची भेट राहुलसोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

मुलीने आरोप केला की, या दरम्यान राहुलने तिच्यावर विवाहासाठी आपल्या आई-वडीलांना तयार करण्यासाठी दबाव आणला.
ऑगस्ट 2019 मध्ये तिचे आई-वडील विवाहासाठी तयार झाले.
सोबतच मुलीने आरोप केला होता की, या दरम्यान तिच्या मर्जीविरूद्ध राहुलने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.

सोबतच एखाद्या गोष्टीला नकार दिल्यास तो मारहाण सुद्धा करत होता.
लिव्ह-इन रिलेशनशिप दरम्यान सर्व खर्च ती करत होती, जो सुमारे एक लाख 25 हजार रुपये होता.

हे देखील वाचा

Ramdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत नाही, ते मनसेचे की राष्ट्रवादीचे?’ असा खेडच्या जनतेला प्रश्न – रामदास कदम

Bal Bothe : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Live In Relationship | spending both or both in live in relationship is not a crime high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update