LIVE मॅचच्या दरम्यान धडाधड मारल्या गोळ्या, पळताना दिसले खेळाडू; एक महिला प्रेक्षकासह 3 लोक जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : LIVE Match | एक बेसबॉल मॅच 9 इनिंगची असते. अमेरिकेत शनिवारी खेळवण्यात आलेली ही मॅच सहाव्या इनिंगमध्ये असतानाच फायरिंग (gun shooting) सुरू झाली. गोळ्यांचा आवाज स्टेडियमच्या (stadium) बाहेरून येत होता परंतु त्याचा परिणाम मैदानाच्या आत दिसत होता. घाबरलेले खेळाडू मैदान सोडून पळताना दिसले तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड भीती दिसून आली.(LIVE Match)

घाबरलेल्या प्रेक्षकांना दुसर्‍या दाराने काढले बाहेर

पोलिसांनी रात्री उशीरा पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन गाड्यांवर बसून आलेल्या लोकांमध्ये आपसात फायरिंग (Firing) झाली. तत्पूर्वी वॉशिंग्टन नॅशनल्सकडून सुद्धा घटनेला दुजोरा देण्यात आला. गोळ्यांचा आवाज आल्याने प्रेक्षक प्रचंड घाबरले होते. प्रथम त्यांना स्टेडियममध्ये बसण्यास सांगण्यात आले. परंतु नंतर स्टेडियमचे दोन मार्ग सेंटरफील्ड गेट (Centerfield Gate) आणि राईटफील्ड गेटने (Rightfield Gate) बाहेर काण्यात आले.

https://twitter.com/alexsalvinews/status/1416574135178862601

1 महिलेसह 3 लोक जखमी

गोळीबारात दोन लोक जखमी झाले. तिसरी महिला ही सामना पहायला आली होती ती सुद्धा जखमी झाल्याचे
नंतर सांगण्यात आले. ही महिला काही कामानिमित्त स्टेडियमच्या बाहेर गेली होती. पोलिसांनी सांगितले या
महिलेला सुद्धा गोळी लागली. पोलिसांनी दोन गाड्यांपैकी एक जप्त केली आहे. तर दुसरीचा शोध सुरू आहे.
आता हा सामना रविवारी होणार आहे.

https://twitter.com/JustinBeland/status/1416573729014943750

हे देखील वाचा

Hyderabad News | दुर्दैवी ! शेतकऱ्याने स्वत:च्या पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी जमा केलेले 2 लाख रुपये उंदरांनी कुरतडले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LIVE Match | gun shooting outside the stadium during washington nationals game fans told to leave 3 people were injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update