Live : पंढरपूरात उद्धव ठाकरेंची तोफ कडाडली ; पाच राज्यात भाजपच्या ठिकऱ्या उडवल्या 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – २७ एकरच्या  मैदान शिवसेनेची तुडुंब सभा घेण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहे. उद्धव ठाकरे  यांनी सभेला उभे राहतातच बाळासाहेबांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्या मैदानावर सभा घेण्याचे धाडस कोणाचे झाले नाही. परंतु मी बाळासाहेबांचा पुत्र आहे त्या मुळे त्यांचा पुत्र असल्याने सभा घेण्याचे धाडस मी केले आहे  असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर त्यांनी सभेच्या व्यासपीठावर येताच त्यांनी  प्रभू श्रीराम , पांडुरंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्त्याचे तर प्रबोधनकार ठाकरे,बाळासाहेब ठाकरे ,मीनाताई ठाकरे  यांच्या प्रतिमा पूजन करून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांच्या अगोदर आमदार तानाजी सावंत यांनी सभेचे प्रास्ताविक केले आहे त्यात त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नांचा आढावा घेतला होता.

ताकाला जाऊन मी भांडे लपवणार नाही
मला लोक राम मंदिराच्या मुद्या बाबत म्हणतात कि तुम्ही लोकसभा  निवडणुकीच्या तोंडावर  राम मंदिराचा मुद्दा उचलताय का ? मी त्या प्रश्नाचे उत्तर होय असे देतो. कारण मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर कडाडून टीका केली आहे.  राम मंदिर आम्हीच बंधू शकतो असे म्हणणाऱ्या योगींना रोखले कोणी  “मग बांधा ना मंदिर! का थांबलाय” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपची खिल्ली उडवून दिली.

उद्धव ठाकरे यांचे भाजप सरकारला सवाल
दुष्काळ मुक्तीचे काय झाले त्यावर सरकार काय करणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी करणार का नाही. कांदा प्रश्नाचे काय झाले. २०० रुपये अनुदानाचे काय झाले.कर्जमाफीचे काय झाले ते सांगा. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही. त्या शेतकऱ्यांचे तुम्ही काय करणार आहे हे सांगा. या प्रश्नांची कायमची सोडवणूक करा आणि त्यानंतरच मी युतीच्या चर्चेला तुमच्या मांडीला मांडी लावून बसेल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.