EMI पासून ते महागाईपर्यंत RBI गर्व्हनर यांच्या महत्वाच्या 6 गोष्टी, जाणून घ्या शक्तिकांत दास यांनी काय-काय दिला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा देत रेपो दरात ०.४० टक्के कपात जाहीर केली आहे. यामुळे सामान्य लोकांचा ईएमआय कमी होऊ शकतो. तसेच आरबीआयने रिव्हर्स रेपो दर कमी करून ३.३५ टक्के केला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महागाई दर अजूनही ४ टक्के खाली राहण्याची शक्यता आहे, परंतु लॉकडाऊनमुळे तो वाढू शकते.

ईएमआय होल्ड करण्याचा कालावधी वाढला
आरबीआयने लोन मोरेटोरियम टर्म ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ती पूर्वी ३१ मे पर्यंत होती. तीन महिने आणखी वाढल्याने आता ६ महिन्यांच्या मोरेटोरियमची सुविधा झाली आहे. म्हणजेच जर आपण या ६ महिन्यात आपला ईएमआय भरला नाही, तर तुम्हाला लोन डीफॉल्ट किंवा एनपीए कॅटेगरी मध्ये मानले जाणार नाही.

व्याज दरात कपात
गव्हर्नर म्हणाले की, एमपीसीच्या बैठकीत ५-६ सदस्यांनी व्याज दर कमी करण्याच्या बाजूने सहमती दर्शवली. या निर्णयामुळे गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जावरील ईएमआय स्वस्त होईल. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीने मागच्या वेळी २७ मार्च रोजी रेपो रेट (केंद्रीय बँक बँकांना ज्या दराने व्याज देते) ०.७५ टक्क्यांनी कमी करत तो ४.१४ टक्के केला होता.

जीडीपी विकास दर नकारात्मक
त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षाचा जीडीपी विकास दर नकारात्मक राहण्याची शंका शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. सिडबीला १५,००० कोटी रुपये वापरण्यासाठी अतिरिक्त ९० दिवसांचा कालावधी मिळेल. एक्स्पोर्ट क्रेडिट कालावधी १२ महिन्यांपासून १५ महिने वाढवला जात आहे.

महागाई वाढण्याची शक्यता
लॉकडाऊनमुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्याचे गव्हर्नर म्हणाले. अन्नधान्याचा पुरवठा एफसीआयमधून वाढवण्यात यावा. देशात रब्बी पीक चांगले आले आहे. उत्तम पावसाळा आणि शेतीकडून बरीच आशा आहे. मागणी आणि पुरवठा प्रमाणामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. सरकारी प्रयत्न आणि रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांचा परिणाम देखील सप्टेंबरनंतर दिसून येईल.

रेपो रेट आता ४.४ ने कमी करून ४.० टक्के झाला
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ४० बेसिस पॉईंटने कपात केली आहे. रेपो दर आता ४.३ टक्क्यावरून ४.० टक्के झाला आहे. त्याचवेळी आरबीआयने रिव्हर्स रेपो दर कमी करून ३.३५% केला आहे. केंद्रीय बँकेने बँकेचे व्याज दर ०.४ टक्क्यांनी कमी केले आहे.

वीज आणि पेट्रोलियम उत्पादन कमी
पत्रकार परिषद सुरू करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, या कठीण काळातून भारत सावरेल हा आत्मविश्वास ठेवावा लागेल. कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच भारतात वीज आणि पेट्रोलियम उत्पादनात घट झाली आहे. आरबीआयने सांगितले की, ६ मोठ्या राज्यात औद्योगिक उत्पादन घटले आहे. कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. मार्चमध्ये सिमेंटचे उत्पादन घटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सरकारकडे बँकांना कॉर्पोरेट कर्जाची हमी देण्याची मागणी केली आहे. अलीकडेच एका वेबिनारला संबोधित करत कुमार म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची भूमिका महत्त्वपूर्ण असू शकते. ते म्हणाले की, सध्याच्या कर्जावरील ईएमआय सूट मर्यादा कमी करून सहा महिने करणे आवश्यक आहे.