Video : पत्त्याच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप वार, भयानक व्हिडीओ व्हायरल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून एका गाँगमधील दोघांनी विरोधी गँगच्या तरुणावर चॉपरने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर वार केल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. मुंबईत गँगवॉर जवळपास संपुष्टात आलं असताना ठाण्यात सुरु असलेलं गँगवॉर शहरातील वातावरण खराब करत असून या गँगस्टर्सचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 

 

https://youtu.be/vLq36oKIve0

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मंदार गावडे आणि अभिषेक जाधव हे दोघे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका पत्त्यांच्या क्लबमध्ये आले. त्यांनी क्लबमध्ये बसलेल्या प्रथमेश निगुडकर या तरुणाचा शोध घेतला. तो दिसताच त्याच्यावर धारदार चॉपरने प्रथमेशवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मंदार आणि अभिषेक या दोन आरोपींनी प्रथमेशच्या डोक्यात, हातावर, मानेवर आणि छातीवर सपासप वार केले.

आरोपींच्या तावडीतून सुटण्याचा प्रशमेशने प्रयत्न केला. मात्र, दोघांनी प्रथमेशला पत्त्यांच्या क्लबच्या खाली नेऊन पुन्हा बेदम मारहाण करुन त्याला जखमी अवस्थेत सोडून पळून गेले. जखमी प्रथमेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी अभिषेक जाधव याला ताब्यात घेते आहे.

काय आहे प्रकरण ?

मागील वर्षी नवी मुंबईतील ऐरोली आणि ठाणे शहराच्या हद्दीवर असलेल्या गरम मसाला या हॉटेलमध्ये जखमी प्रथमेश हा मित्रांसोबत असताना त्याठिकाणी मंदार गावडे आणि त्याच्या साथिदारांनी प्रथमेश आणि त्याच्या साथिदारांवर गोळीबार केला होता. याप्रकरणी खटला सुरु असून प्रथमेश हा त्यामध्ये साक्षीदार आहे. या खटल्यात त्याची महत्त्वाची साक्ष आहे. त्यामुळे प्रथमेशला शोधत मंदार आणि अभिषेक पत्त्याच्या क्लबमध्ये आले आणि आमच्या विरोधात साक्ष कशी देतो हेच पाहतो ? असं बोलून त्याच्यावर सपासप वार केले.