192 मतदान केंद्रावरुन होणार मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत लाइव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्‍हावी, कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहण्‍याच्‍या दृष्‍टीने निवडणूक आयोगाकडून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात येत आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात 192 मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रियेचेलाइव्ह वेबकास्टिंग करण्‍यात येणार असल्‍याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्‍यात आली.

अहमदनगर मतदारसंघात 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्‍यासाठी सर्व उपाययोजना करण्‍यात येत आहेत. मतदान प्रक्रियेच्‍या संदर्भात निवडलेल्‍या मतदान केंद्रावरुनलाइव्ह वेबकास्टिंग करण्‍यात येणार आहे. मतदान केंद्राचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली येणार आहे. त्यानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. बुथ परिसरातील सर्व हालचाली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पाहता येणार आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदार संघात 2 हजार 30 मतदान केंद्र आहेत. त्‍यापैकी 192 मतदान केंद्रावर लाइव्ह वेबकास्टिंग करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये शेवगाव 37, राहुरी 30, पारनेर 25, नगर 30, श्रीगोंदा 34, कर्जत- जामखेड 36 मतदान केंद्रावर वेबकास्‍टींग करण्‍यात येणार आहे. तर 152 मतदान केंद्रावर सुक्ष्‍म निरिक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.