×
Homeआरोग्यLiver कमजोर होण्यापूर्वी शरीर देते हे ५ संकेत, ताबडतोब व्हा अलर्ट; अन्यथा...

Liver कमजोर होण्यापूर्वी शरीर देते हे ५ संकेत, ताबडतोब व्हा अलर्ट; अन्यथा होईल उशीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लिव्हर (Liver) मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे. अन्न विघटन करण्यासाठी पित्त तयार करणे, न्यूट्रिएंट्स साठवणे आणि रोगापासून संरक्षण करणे अशी अनेक महत्त्वाची कामे लिव्हर  करते. या अवयवामध्ये काही समस्या झाल्यास महागात पडू शकते. म्हणूनच लिव्हरचे रोगांपासून संरक्षण करणे ही मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच वेळेत रोगाचे संकेत ओळखले पाहिजेत (Liver Disease Symptoms).

 

१. त्वचा पिवळी पडणे
जेव्हा लिव्हरमध्ये कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा त्याचा परिणाम थेट त्वचेवर दिसून येतो. कावीळ झाली की त्वचेचा आणि नखांचा रंग पिवळा होऊ लागतो. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन बिलीरुबिन टेस्ट करून घ्यावी.

 

२. त्वचेला खाज सुटणे
जेव्हा लिव्हर कमकुवत होते किंवा खराब होते तेव्हा रक्तामध्ये पित्त तयार होते आणि नंतर ते त्वचेच्या खालच्या भागात जमा होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर खाज येण्याची समस्या होते. खाज अनेक कारणांमुळे होऊ शकते, परंतु हे लिव्हरच्या आजाराचे लक्षण आहे.

४. त्वचेवर निळसर चट्टे
अनेक वेळा शरीरावर निळे चट्टे दिसू लागतात आणि सहजपणे रक्तस्राव होऊ शकतो, हे लिव्हरच्या समस्येचे मोठे लक्षण आहे.
ब्लड क्लॉटींग रोखण्यासाठी ज्या प्रोटीनची आवश्यकता असते ते योग्य प्रमाणात लिव्हर बनवू शकत नाही. अशावेळी तत्काळ चाचण्या करणे आवश्यक आहे.

 

५. त्वचेवर स्पायडर एंजियोमा बनणे
स्पायडर अँजिओमा हा त्वचेच्या खालच्या भागात होणारा आजार आहे,
ज्यामध्ये शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढल्यावर त्वचेचे टेक्सचर कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसू लागते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Liver | Before the liver weakens, the body gives these 5 signals, be alert immediately; Otherwise it will be late

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान

Must Read
Related News