Liver Detox | लिव्हरमध्ये जमा झालेले विष कसे नष्ट करावे, जाणून घ्या काय सांगते विज्ञान आणि काय आहे पद्धत

0
496
Liver Detox | health liver detox is possible know the how to clean naturally
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लिव्हर (Liver Detox) हा शरीराच्या आतील सर्वात मोठा अवयव आहे. लिव्हर शरीरातील किमान ५०० आवश्यक कार्यांसाठी जबाबदार आहे. लिव्हर शरीरातील टॉक्सीन म्हणजे विषारी द्रव्ये काढून टाकते. हे एक महत्त्वाचे कार्य आहे. म्हणजेच, विषाचा प्रभाव नाहीसा करून, त्याचे रूपांतर इतर गोष्टींमध्ये करते. लिव्हर हे स्वतःच एक डिटॉक्सिफिकेशन अवयव आहे. तुम्ही असा विचार करू शकता की लिव्हरची (Liver Detox) साफसफाई करून, शरीरात लिव्हरशी संबंधित ज्या काही समस्या असतील, त्या ठिक होतील. लिव्हरची स्वच्छता केल्याने मेटाबॉलिज्म वाढते आणि वजनही झपाट्याने कमी करता येते, असे अनेकदा सांगितले जाते. यासाठी लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचे अनेक प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. पण लिव्हर डिटॉक्सिफायिंग प्रॉडक्ट मदत करतात असा कोणताही पुरावा नाही (Liver detoxification truth).

 

या नैसर्गिक गोष्टींनी लिव्हर होईल डिटॉक्स

१. मिल्क थिस्सल :
मिल्क थिस्सल ही एक वनस्पती आहे जी नैसर्गिकरित्या लिव्हर डिटॉक्स करते. मिल्क थिस्सलच्या बिया खाल्ल्या जातात. लिव्हरसाठी हानिकारक विष ही वनस्पती शोषून घेते आणि लिव्हरचे संरक्षण करते. मिल्क थिस्सल ही अँटी इंफ्लेमेटरी वनस्पती आहे. ज्यामुळे लिव्हरला सूज येत नाही. (Liver Detox)

 

२. हळद :
लिव्हरच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी हळद सर्वोत्तम आहे. हळद सूज वाढवणारे मॉलिक्यूल नष्ट करते. ज्यामुळे लिव्हरचा आजारांपासून बचाव होतो. हळदीमध्ये असलेले करक्यूमोनोइड्स लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते.

३. बीट :
बीटदेखील एक अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थ आहे, ज्यामध्ये बिटालॅन नावाचे फायटोन्यूट्रिएंट आढळते. हे लिव्हरला आजारांपासून वाचवते.

 

४. आंबट-गोड फळे :
लिंबू, किनू, संत्रे यांसारख्या आंबट फळांमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात, जे लिव्हरच्या पेशींमधून फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. यामुळे लिव्हरच्या पेशी निरोगी राहतात. तसेच हंगामी भाज्या, फळे, कडधान्य, शेंगा, काजू, बिया, मासे, अंडी, ऑलिव्ह ऑईल लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Liver Detox | health liver detox is possible know the how to clean naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High BP | आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे ‘हाय ब्लड प्रेशर’; बचावासाठी सेवन करा ही ३ फळे

Benefits of Onion | ‘या’ जबरदस्त उपायाने केसांना मिळेल नवजीवन, होतील दाट आणि लांबसडक

Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा