Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – निरोगी शरीरासाठी लिव्हर मजबूत असणे आवश्यक आहे. लिव्हर खराब झाल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. लिव्हर खराब होण्याचे सर्वात मोठे कारण आपले खाणे-पिणे आहे. कोणत्या वस्तू लिव्हरचे सर्वात जास्त नुकसान करतात ते जाणून घेवूयात…

1 साखर –
साखर लिव्हरसाठी त्रासदायक आहे. खुप जास्त रिफाईंड साखर आणि हाय फ्रक्टोज तुमचे फॅट वाढवते, ज्यामुळे लिव्हरचे आजार होतात. काही अभ्यासानुसार, साखर लिव्हरला दारूप्रमाणे खराब करते, जरी तुमचे वजन जास्त नसले तरी सुद्धा. आपल्या डाएटमध्ये अ‍ॅडेड शुगर, सोडा, पेस्ट्री आणि कँडीसारख्या वस्तूंचा कमी समावेश करा.

2 हर्बल सप्लीमेंट –
काही नॅचरल वस्तूसुद्धा तुमच्या लिव्हरचे नुकसान करतात. जसे काही महिला मेनोपॉजमध्ये आराम मिळवण्यासाठी कावा ही आयुर्वेदिक वनस्पती घेतात, परंतु स्टडीजनुसार, ही लिव्हरला योग्य पद्धतीने काम करण्यापासून रोखते, ज्यामुळे हेपेटायटिस आणि लिव्हर फेल होऊ शकते. काही देशांमध्ये अशाप्रकारच्या वनस्पती औषधांवर प्रतिबंध आहे. अशा वनस्पती घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3 वाढलेले वजन –
लिव्हर सेल्समध्ये जास्त फॅट जमा झाल्याने नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढतो. ज्या कारणामुळे लिव्हरमध्ये सूज वाढते. काही काळाने हे लिव्हरला कठोर बनवते. जर तुम्हाला डायबिटीज असेल, वय 40 पेक्षा जास्त असेल आणि वजन जास्त असेल तर तुमच्यात नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका जास्त आहे.

4 खुप जास्त व्हिटॅमिन ए सप्लीमेंट –
तुमच्या शरीराला व्हिटॅमिन एची खुप आवश्यकता असते. याची भरपाई लाल, नारंगी किंवा पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्यांनी करा. जर तुम्ही व्हिटॅमिन ए चे सप्लीमेंट खुप जास्त घेत असाल तर याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो. व्हिटॅमिन ए चे सप्लीमेंट आपल्या डॉक्टरांना विचारून घ्या.

5 सॉफ्ट ड्रिंक्स –
स्टडीत हे स्पष्ट झाले आहे की, जे लोक सॉफ्ट ड्रिंक जास्त पितात त्यांच्यात नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसीज जास्त होतात. आपल्या डाएटमध्ये सोडाचा कमीत कमी वापर करा. त्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस प्या.

6 एसिटामिनोफेन –
सामन्यपणे लोक पाठदुखी, डोकेदुखी आणि सर्दी इत्यादीमध्ये पेन किलर घेतात. तुम्ही किती प्रमाणात पेनकिलर घेता यावर खुप लक्ष देण्याची गरज आहे. या औषधांमध्ये एसिटामिनोफेन असते, ज्याचा परिणाम लिव्हरवर होतो. एका दिवसात आवश्यकतेपेक्षा जास्त डोस घेतल्याने लिव्हरला त्रास होऊ शकतो. म्हणून डॉक्टरचा सल्ला घ्या.

7 ट्रान्स फॅट –
काही पॅकेज्ड आणि बेक्ड फुड ट्रान्स फॅट वाढवतात. ट्रान्स फॅटमुळे वजन वाढते.

8 अल्कोहलची मात्रा –
दारूचे जास्त सेवन केल्याने थेट लिव्हरवर परिणाम होतो. यासाठी अल्कोहलचे सेवन शक्यतो टाळा.