Liver Health Tips | कॉफीपासून फळे आणि भाज्यांपर्यंत, जाणून घ्या कोणत्या प्रकारचे 7 फूड्स लिव्हर ठेवतात हेल्दी?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Liver Health Tips | लिव्हर (Liver) हे शरीराचे पॉवर हाऊस आहे. हे विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण कार्य करते आणि प्रोटीन (Protein), कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि पित्त (Bile) तयार करण्यास देखील मदत करते. याशिवाय, ते जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals) आणि अगदी कार्बोहायड्रेट (Carbohydrates) देखील साठवते. याव्यतिरिक्त, लिव्हर अल्कोहोल, औषधे आणि चयापचयातील (Liver Health Tips) नैसर्गिक उप-उत्पाद विघटीत करते.

 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी लिव्हर अनेक कार्ये करत असल्याने लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी (Liver Health Tips) आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणते खाद्यपदार्थ लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवतात, ते जाणून घेवूयात (Let’s Know Which Foods Are Good For Liver Health)…

 

1. चहा (Tea):
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जी लिव्हरचे आरोग्य (Liver Health) सुधारण्यास मदत करतात. ब्लॅक (Black Tea) आणि ग्रीन टी (Green Tea) लिव्हरमधील एन्झाईम्स (Enzymes) आणि फॅट्सची पातळी सुधारण्यास मदत करतो. विशेषतः ग्रीन-टी लिव्हरची एंझाइम पातळी सुधारते, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि लिव्हर चरबी कमी करू शकते.

 

2. टोफू (Tofu) :
टोफू लिव्हरसाठी देखील चांगले आहे कारण ते सोयापासून बनलेले असते आणि ते लिव्हरमधील चरबीचे प्रमाण कमी करते. हेल्दी प्रोटीन पर्याय असल्याने सोया आणि टोफू यकृताच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे.

3. फळ (Fruit) :
फळांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने लिव्हरचे आरोग्य चांगले राहते. आंबट फळे (Sour Fruits) जसे की संत्री (Oranges) आणि द्राक्षे (Grapes) देखील उपयुक्त ठरू शकतात. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते.

 

त्याचप्रमाणे द्राक्षांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) लिव्हरचे रक्षण करण्याचे काम करते. क्रॅनबेरी (Cranberry) आणि ब्लूबेरीसारख्या (Blueberry) फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.

 

4. ओट्स (Oats) :
ओट्समध्ये भरपूर फायबर असल्याने ते लिव्हरसाठीही निरोगी असते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, ओट्स लिव्हर पुनर्प्राप्तीस गती देण्यासाठी ओळखले जाते.

 

5. कॉफी (Coffee) :
कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात केले तर त्याचा आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. कॉफीमुळे लिव्हरच्या आजारांचा धोकाही कमी होतो.
संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या लोकांना जुना लीनरचा आजार आहे,
त्यांना कॉफी पिण्याने सिरोसिस किंवा कायमस्वरूपी लिव्हर खराब होण्याचा धोका कमी आहे.
ते कमी प्रमाणात प्यायल्याने लिव्हरच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

 

6. भाज्या (Vegetables) :
तुमच्या आहारात क्रूसिफेरस भाज्यांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, जुनाट आजार टाळण्यास मदत होते
आणि मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते. क्रूसिफेरस भाज्या विशेषतः लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगल्या असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे ब्रोकोली (Broccoli), कोबी (Cabbage), पालक (Spinach) या भाज्यांचा आहारात समावेश करा.
त्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग टाळण्यासाठी आणि लढण्यास मदत करू शकतात.

7. नट (Nut) :
चरबीचे निरोगी स्त्रोत जसे की काजू (Cashew) सूज कमी करू शकते. एक सोपा नाश्ता असल्याने, नट तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.
ते व्हिटॅमिन-ई आणि वनस्पती संयुगांनी समृध्द असतात आणि अल्कोहोलमुळे लिव्हरच्या आजारांचा धोका कमी करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

#हेल्दी टिप्स #हेल्दी लाइफस्टाइल #लिव्हर हेल्थ टिप्स  #हेल्दी डाइट #Lifestyle #Health #Health Tips #Healthy Lifestyle #Liver Health Tips #Liver Diet #Foods For Healthy Liver #Healthy Diet Tips #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Liver Health Tips | from vegetables fruits to coffee and tea know the kind of foods keep liver healthy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Protein Diet | हेल्दी राहण्यासाठी शाकाहारी लोकांनी ‘डाएट’मध्ये सहभागी कराव्यात प्रोटीनने समृद्ध ‘या’ 7 भाज्या; जाणून घ्या

 

Blood Sugar Level Control | कोणते फूड्स वाढवतात ‘ब्लड शुगर’ आणि कोणते कमी करतात? येथे जाणून घ्या यादी

 

BP Control Tips | ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय अवलंबा; जाणून घ्या