खळबळजनक ! प्रसिद्ध हल्दीरामच्या मेदूवड्यात आढळलं मेलेलं पालीचं पिल्लू

नागपूर : पोलीसनाम ऑनलाईन – नागपूरमधील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्यांची झुंबड उडते. मात्र अजनी चौकातील हल्दीरामच्या या रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने मागविलेल्या मेदूवड्यात चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वर्ध्याचे यश अग्निहोत्री कुटुंबियांसह नागपूरच्या अजनी चौकातील हल्दीरामच्या आउटलेटमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मेदूवडा ऑर्डर केला. त्यांना तेथील कर्मचाऱ्याने मेदूवडा दिला. त्याच्यासोबत सांबरही दिले. परंतु त्यांनी ऑर्डर केलेल्या सांबरमध्ये पालीचं मेलेलं पिल्लू दिसलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकऱणी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like