तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन सुरु झालं आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचे संकट आहे.

भारनियमनाच्या या गोष्टीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लोडशेडिंगवरून जाळपोळ-तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदार नाही,असं ट्विट करून इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर हँडलवर सहनशीलतेला मर्यादा असतात असं म्हणत एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9bce9fe-cbb0-11e8-bee7-23eb784f8cbd’]

जितेंद्र आव्हाड यांनी वीज नसल्याने कार्यकारी अभियंत्याला फोन केला. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अभियंत्याच्या तोंडाला काळं फासल्यावर त्यांना आमचा फोन ऐकू जाईल असंही आव्हाड म्हटले आहेत.

आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहे की , सतत लोडशेडिंग,त्यातही लोडशेडिंगच्या वेळांशिवायही लाइट जाण्याचे प्रकार वाढलेत. अशावेळी स्थानिक लोक आम्हाला शिव्या देतात. आम्ही फोन केला तर अधिकारी आमदारांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. या कारणामुळे भारनियमनावरून जाळपोळ झाली तर त्याची सुरुवात माझ्या मतदारसंघातून होईल मात्र त्याला आम्ही जबाबदार नसू असा इशाराच आव्हाड यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून भारनियमनावर टीका केली आहे. औरंगाबाद हे मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर आहे इथे सकाळी साडेसहा वाजल्यापासून वीज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी भारनियमनमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा केली होती त्याचे काय झाले? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

[amazon_link asins=’B01I59VBLO,B01L3I1BF0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33156525-cbb1-11e8-97b2-ff068aa8725d’]

आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून काही ठिकाणी भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने भारनियमनाचा प्रश्न इथूनपुढे आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B07GB9Z17Z,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48d3304d-cbb1-11e8-affe-852814dec184′]