Load Shedding in Maharashtra | ‘महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही’ – ऊर्जामंत्री नितीन राऊत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Load Shedding in Maharashtra | महाराष्ट्रात भारनियमनावरुन (Load Shedding in Maharashtra) अनेक वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकातही समिंश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. दरम्यान ‘राज्यात भारनियमनाच्या नुसत्याच वावड्या उठत असून गेल्या 20 ते 25 दिवसांपासून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होत नसल्याचा दावा केला आहे. तसेच यापुढेही राज्‍यात भारनियमन होवू देणार नाही,’ असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितलं आहे.

 

जळगाव (Jalgaon) येथे माध्यमांशी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, ”राज्यातील विविध ठिकाणी वीज भारनियमनाबाबत अनेक संभ्रम आहेत. राज्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून कुठेच भारनियमन नाही. भारनियमन बाबत राज्यात नुसत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीत कुठेच भारनियमन नाही, त्याचबरोबर यापुढे राज्यामध्ये कुठेच भारनियमन होणारही नाही,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, ”महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्पांसाठी कोळशाच्या उपलब्धतेची स्थिती अद्याप सुधारलेली नाही,
मात्र, राज्य सरकार राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेत आहे.”
असं नितीन राऊत काल (गुरुवारी) नाशिकमध्ये (Nashik) म्हणाले होते.

 

Web Title :- Load Shedding in Maharashtra | maharashtra energy minister and congress leader nitin raut says no load shedding in the state anymore

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा