मंगलदास बांदलांनी ‘या’ पध्दतीनं कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मैत्रीचे संबंध प्रस्तापितकरून त्यांच्यानावावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी आज पुणे ग्रामीण ( शिक्रापूर )पोलिसांनी मंगलदास विठ्ठलराव बांदल याला अटक केली आहे.

याप्रकरणी दत्तात्रय मांढरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर बांदलला पैशाची खूप गरज असल्याचे सांगत फिर्यादी यांच्या नावावर खोटे खरेदीखत तयार करून त्याद्वारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून प्रथम 8 लाख रुपये कर्ज घेतले. ते स्वत आर्थिक फायदयसाठी वापरले. त्यानंतरही फिर्यादी यांचे कुलमुखलत्यारपत्र व बनावट पुरवणी दस्त तयार केले. तसेच फिर्यादी यांच्या परस्पर बँकेतून 1 कोटी 25 लाख रुपये कर्ज काढले. मात्र त्याचे हप्ते न भरता 2 कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी करत फसवणूक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आज अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.