शेतकऱ्यांनो थकीत कर्जासाठी आत्महत्या करु नका,आता लढायला तयार रहा – खा. शेट्टींचे आवाहन

पैठण (औरंगाबाद): पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यान राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्येचा विचार करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे , असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शेतकरी सन्मान अभियानामध्ये आजचा शेतकरी मेळावा एकनाथांच्या पैठण नगरीत संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा, तुम्हाला फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,असा इशारा राजू शेट्टीं यांनी दिला.

पंतप्रधान राज्यातल्या शेतकर्यांनी पीक विमा योजनेत नऊ हजार कोटी रुपयांचा भरणा केला. त्याबदल्यात शेतकऱ्यांना भरपाई म्हणून फक्त हजार अकराशे कोटी रुपये माघारी मिलाले . मग ही योजना कॉर्पोरेट कंपन्यासाठी आहे की शेतकऱ्यांसाठी? असा सवाल खासदार राजू शेट्टींनी करण्यासाठी शेतमालाला दिडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा ही दोन खासगी विधेयके अखिल भारतीय किसान संघर्ष समिती संसदेत मांडणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे .

या अभियानात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही.एम.सिंग,पश्चिम बंगाल किसान संघटनेचे अविक शहा हे सहभागी झालेत. त्यापूर्वी शेतकरी सन्मान यात्रेचं पैठणमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्याची वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढली.