Loan Without Guarantee | खुशखबर ! शेतकरी आता विनागॅरंटी घेऊ शकतात 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Loan Without Guarantee | शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu kisan credit card scheme) सुरू करण्यात आले आहे. पशु किसान क्रेडिट कार्डच्या अटी मोदी सरकार (Modi Government) च्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) स्कीमप्रमाणे आहेत. या अंतर्गत कमाल 3 लाख रुपयांपर्यतची रक्कम गाय, म्हैस, बकरी, कोंबडी पालनासाठी मिळेल. यामध्ये 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेण्यासाठी कोणतीही गॅरंटी (Loan Without Guarantee) द्यावी लागणार नाही.

बँकर्स कमेटीने सरकारला आश्वासन दिले आहे की पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ सर्व पात्र अर्जदारांना मिळेल. या योजनेच्या माहितीसाठी बँकांद्वारे शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. पशु वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये विशेष होर्डिंग लावून योजनेची माहिती दिली जाईल. राज्यामध्ये जवळपास 16 लाख कुटुंबे अशी आहेत, ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत आणि त्यांचे टॅगिंग केले जात आहे.

गाय, म्हैशीसाठी किती पैसे मिळतील?

गाईसाइी 40,783 रुपये देण्याची तरतूद आहे.

प्रति म्हैशीसाठी 60,249 रुपये.

बकरीसाठी 4063 रुपये मिळतील.

कोंबडीसाठी (अंडी देणारी) 720 रुपयांचे कर्ज मिळेल.

कार्डसाठी काय असेल पात्रता

अर्जदार हरियाणा राज्याचा रहिवाशी असावा.

अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड ,वोटर आयडी कार्ड.

मोबाइल नंबर.

पासपोर्ट साईज फोटो.

किती असेल व्याज

बँकांद्वारे सामान्यपणे 7 टक्के व्याजदराने लोन दिले जाईल.

पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांना केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

3 टक्केची सुट केंद्र सरकारकडून देण्याची तरतूद आहे.

कर्ज रक्कम कमाल 3 लाख रुपयांपर्यंत असेल.

 

असा करा अर्ज

हरियाणा राज्यातील इच्छूक लाभार्थ्यांना Pashu Credit Card बनवण्यासाठी जवळच्या बँकेत जावे लागेल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन बँकेत जा. तिथे अर्ज भरा.

अर्ज भरल्यानंतर केवायसी करा. केवायसीसाठी शेतकर्‍यांना आधार कार्ड (Aadhaar card), पॅन कार्ड (Pan card), वोटर कार्ड (Voter id card) आणि पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागेल.

पशुधन क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी बँकेकडून केवायसी होणे आणि अर्ज पडताळणीनंतर 1 महीन्याच्या आत पशु क्रेडिट कार्ड मिळेल.

Web Title :- Loan Without Guarantee | good news farmers will get 1 lakh 60000 rupees loan without guarantee check know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | प्रॉपर्टी नावावर करून देण्यासाठी मुलांकडून वडिलांना बेदम मारहाण

DSK Group Cheating Case | फसवणूक प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून कुलकर्णी कुटुंबाला मोठा दिलासा

Sleeping Tips | खुप वेळ सोफ्यावर झोपणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कसे ‘ते’ जाणून घ्या…