वाळू तस्करी रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत तलाठ्याची मुजोरी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – वाळू तस्करीविरोधात जिल्हा प्रशासन कडक कारवाई करत असताना परभणीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यावरच तलाठ्याने हात उचलल्याची घटना पुर्णा तालुक्यात समोर आली आहे. दरम्यान आपण ज्यांच्यावर हात उचलला ते जिल्हाधिकारी असल्याचं समोर आल्यावर त्याने तेथून धूम ठोकली.

खंडू पुजारी असं तलाठ्याचं नाव आहे.

पुर्णा तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरु आहे. तो रोखण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर गेले होते. त्यावेळी कानखेड येथे गेल्यावर त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक व्यक्ती येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवून त्यांनी चौकशी केली.

मात्र त्यांनी आपण जिल्हाधिकारी असल्याचंही सांगितलं. परंतु बाळू तस्करीबाबत ते बोलताच तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने त्यांच्यावर हात उचलला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने त्याला रोखलं. मात्र ते जिल्हाधिकारी आहेत असं समजल्यावर त्याने तेथून धूम ठोकली.

खंडू पुजारी हा वसमत तालुक्यातील रिधुरा सज्जाचा तलाठी आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.