वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – पेरणे ( ता: हवेली) येथे १ जानेवारी रोजीच्या अनुषंगाने विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बाधवांची सुरक्षा व सोय करण्यासाठी स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी केले. वाघोली येथील श्रेयस मंगल कार्यालयात विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी बोलताना वारके यांनी स्थानिकांचे आभार मानले.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, सरपंच, यांसह परिसरातील विविध सामाजिक, राजकीय पदाधिकारी व अनेक मान्यवर नागरिक, महिला उपस्थित होते.
मागील वर्षी त्रुटी पोलिसांनी पूर्ण केल्या असून बांधवांना सर्व सोयी सुविधा व सुरक्षा देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. मानवंदनेसाठी येणाऱ्या नागरिकांना चहा, नाष्टा, जेवण, पाण्याची सोय करणार असल्याचे उपस्थितांनी आश्वासन दिले. पेरणे फाटा येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळा पासून विजयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक या बसेस करतील.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- 8 तासांपेक्षा जास्त झोप घेता ? ‘या’ 4 प्रकारे जीवाला होऊ शकतो धोका !
- ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश केला तर वाढेल स्मरणशक्ती !
- ‘अॅसिडिटी’मुळे आहात हैराण ? करा ‘हे’ 4 घरगुती उपाय
- चुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात !
- उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ ९ उपाय करा ! जाणून घ्या
- हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी
- सावधान ! पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरल्यास होतात ‘हे’ 4 धोके