मुंबईत लवकरच सुरू होणार लोकल ट्रेन, ‘या’ लोकांना मिळणार प्रवास करण्याची परवानगी

मुंबई : संपूर्ण मुंबई कोराना व्हायरसच्या संसर्गाला तोंड देत आहे. मुंबईत आतापर्यंत 56,831 कोविड केस समोर आल्या आहेत. या दरम्यान, मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे की, लोकल ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय रविवारी घेतला जाऊ शकतो. अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी ईएमयू सेवा सुरू होऊ शकते.

तत्पूर्वी गुरूवारी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवश्यक सेवेत काम करणार्‍या लोकांना, सुरक्षितरित्या ये-जा करण्यासाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचे महत्व पटवून दिले. याशिवाय, सीएम उद्धव ठाकरे यांनी अगोदरच केंद्राकडे लोक ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे.

इतर दिवशी लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईन म्हटले जाते, जिच्याद्वारे दररोज सुमोर 80 लाख लोक मुंबईच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात जात असतात. यामध्ये तीन लोकल लाईन आहेत. वेस्टर्न लाईन जी चर्चगेट ते विरार पर्यंत, सेंट्रल लाईन जी सीएसटी से कल्याणच्या पुढे जाते आणि हार्बर लाईनसुद्धा आहे, जी नवी मुंबई-पनवेलपर्यंत जाते.

महाराष्ट्रात कोविड-19 चे 3,427 नवे रूग्ण
महाराष्ट्रात शनिवारी कोविड-19 चे 3,427 नवे रूग्ण समोर आले तर 113 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यात संसर्गाची 1.04 लाखापेक्षा जास्त प्रकरणे आहेत, तर मृतांची संख्या 3,830 आहे. एकट्या मुंबईत 56,831 प्रकरणे तसेच मृतांची संख्या 2,113 आहे.