Maharashtra Unlock : सोमवारपासून अनलॉक मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षाच?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील जिल्ह्यांची पॉझिटिव्ही रेट आणि व्यापलेल्या ऑक्सिजन बेडच्या टक्केवारीनुसार पाच गटात वर्गवारी केली आहे. त्यावरच संचारबंदी हटवण्यासह इतर सेवांना परवानगी दिली जाणार आहे. सोमवारपासून याची अंलबजावणी होणार आहे. मात्र मुंबईकरांना लोकलच्या प्रवासातही (Local travel) अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

राज्य सरकारने केलेल्या नियोजनानुसार पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमधील सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी लोकल सेवाही सुरु होणार आहे. विशेष म्हणजे आपत्ती स्थानिक व्यवस्थापन विभागास स्थितीनुसार निर्बंध घालण्याची मुभा या आदेशात देण्यात आली आहे.

Aadhaar Card for Children : लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे अत्यावश्यक, जाणून घ्या

लोकल सेवा सुरू होऊ शकते का?

कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले असतील अशा जिल्ह्यांचा समावेश पहिल्या गटात करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा ५.२५ टक्के असून, ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही जवळपास ७.५४ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या गटात होत असल्याने मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना लोकलमधून प्रवास (Local travel) करण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

मोदीजी, 7 वर्ष जरी शाळा बंद कराव्या लागल्या तरी हे बलिदान आम्ही देऊ… सोशल मीडियावर वायरल होतोय क्यूट मुलांचा VIDEO

तिसऱ्या गटात येणाऱ्या जिल्ह्यात कोणते निर्बंध हटणार?

अत्यावश्यक दुकानं सकाळी ७ ते २

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुली राहतील,

सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेनं दुपारी २ पर्यंत खुली राहतील, तर त्यानंतर पार्सल सेवा

मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा

खासगी आणि शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेनं सुरू

सोमवार ते शुक्रवार आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू

सोमवार ते शनिवार स्टुडियोत चित्रीकरण करता येणार

मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेसह दुपारी २ पर्यंत खुले

बांधकामांना दुपारी दोन पर्यंत

मॉल्स थिएटर्स सर्व बंद राहतील

शनिवार रविवार बंद राहतील.

लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहणार .

जमावबंदी\संचारबंदी कायम राहणार.