जिओ इन्स्टिट्यूट शोधून दाखवा आणि ११ हजारांचे बक्षीस मिळावा 

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

नुकतेच रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला ‘गुणवत्तासंपन्न ‘ असे प्रशस्तीपत्र मोदींकडून देण्यात आले आहे.  पण आता अस्तित्वात नसलेल्या संस्थेला गुणवंत्तसम्पन्न म्हटल्यामुळे सध्या मोदी सरकार चांगलेच निशाण्यावर आहे. सोशल नेटवर्किंग साईटस वर तर याबाबत खिल्ली उडवली जात आहे. आता मनसेनेही सरकारची खिल्ली उडवली आहे. पुणे  मनसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी  जिओ इन्स्टिट्यूट हरवली असून, ती सापडल्यास कळवा आणि ११ हजार रुपयांचं बक्षीस मिळवा, असे आवाहन केले आहे.
[amazon_link asins=’B01N9HX7SO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4766b4ca-84f4-11e8-aca7-b1d7b67c184f’]

जीओ  इन्स्टिटयूट ला ‘गुणवतासंपन्न ‘ शैक्षणीक संस्थेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर सर्वत्र मोदी सरकारची खिल्ली उडवली जात आहे. भाजपने पुन्हा एकदा मुकेश आणि नीता अंबानी यांना फायदा पोहचवल्याची तक्रार करीत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. तसेच अस्तित्वात नसलेल्या संस्थेला असा दर्जा देण्यामागचे निकष सरकारने जाहीर करावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आता मनसेने देखील या प्रकरणाची  खिल्ली उडवत थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना लक्ष्य केले आहे. जिओ इन्स्टिटयूट हरवली आहे . ती सापडल्यास कळवा आणि ११ हजार रुपयांचे बक्षीस घेऊन जा. असे उपरोधात्मक आवाहन मनसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केले आहे. तसेच जिओ इन्स्टिटयूट सापडली नाही तर, जावडेकर यांनी राजीनामा द्यावा, तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ‘इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्स’मध्ये (आयओई) समावेश करावा, अन्यथा जावडेकरांविरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.
[amazon_link asins=’B01956BD46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c6739c2-84f4-11e8-b20c-675126b63110′]