फक्त SMS पाठऊन ‘LOCK’ करा तुमचा आधार नंबर, कोणीपण नाही करू शकणार ‘गैरवापर’, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सिम विकत घेण्यापासून ते बँकेचे अकाउंट उघडण्यापर्यंत आधारचा वापर सर्व सामान्य माणूस करत आला आहे. त्यामुळे आधार कार्ड ही एक महत्वाची गोष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी आधार कार्ड मधील डेटा लीक होत असल्याची समस्या लक्षात घेऊन यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआईडीएआयने एक नवीन फिचर सुरु केले आहे. यावरून आधार वापरकर्ते आधार नंबर लॉक आणि अनलॉक करू शकतात.

या नवीन फीचरमुळे फसवणुकीसारख्या प्रकारांना देखील आळा बसणार आहे. हे फिचर एखाद्या कुलुपाप्रमाणे काम करणार आहे. त्यामुळे हॅकर्स सारखे लोक आता बिना परवानगी व्हेरिफिकेशन करू शकणार नाहीत.

अशा प्रकारे करू शकता आधार लॉक

1. आधार नंबर लॉक करण्यासाठी GETOTP असं लिहून तो एसएमएस 1947 वर पाठवावा लागणार आहे. यांनतर कार्ड धारकाच्या फोनवर एक ओटीपी येईल.

2. ओटीपी मिळाल्यानंतर कार्ड धारकाला LOCKUID आधार नंबर लिहून पुन्हा एकदा 1947 वर मेसेज पाठवावा लागणार आहे. यानंतर आधार नंबर लोक होऊन जाणार आहे.

अशा प्रकारे करू शकता अनलॉक

1. आधार नंबर अनलॉक करण्यासाठी कार्ड धारकाला रजिस्टर मोबाइल नंबर वरून GETOTP आधार क्रमांक लिहून हा मेसेज  1947 वर पाठवावा लागले आणि त्यानंतर ओटीपी मिळवावा लागले.

2. सहा आकडी ओटीपी मिळाल्यानंतर UNLOCKUID आधार नंबर आणि ओटीपो लिहून तो मेसेज 1947 वर पाठवावा लागेल त्यानंतर तुमचा आधार नंबर अनलॉक होणार आहे.

Visit : Policenama.com