काय सांगता ! होय,अन्न वाटता वाटता तो भीक मागणार्‍या मुलीच्या प्रेमातच पडला, युवकानं उरकलं लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन दरम्यान अशा अनेक कथा समोर आल्या आहेत. जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक अनोखा विवाह पाहायला मिळाला आहे. जिथे फुटपाथवर भोजन वाटप करत असताना एक तरूण भीक मागत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला आणि दोघांनीही लग्न केले. या लग्नात बरेच लोक उपस्थित होते आणि सामाजिक अंतरासाठी पूर्ण काळजी घेतली गेली. दारिद्र्यामुळे, फुटपाथवर भिक मागणाऱ्यामध्ये बसणाऱ्या नीलमला रोज एक तरुण अन्न वाटत होता. त्याच तरूणाने नीलमबरोबर सात फेरे घेतले. या विवाहाबद्दल जो ऐकेल त्याला आश्चर्य वाटेल यात शंकाच नाही.

नीलमला वडील नाहीत, आई अर्धांगवायूने ग्रस्त आहे. भाऊ व मेव्हण्यांनी मारहाण करुन घरातून पळ काढला होता. नीलमकडे जगण्यासाठी काहीही नव्हते. तर ती लॉकडाऊनमध्ये खाण्यासाठी फुटपाथवर भिकार्‍यांच्या लाईनमध्ये बसत असे. सर्वांना अन्न देण्यासाठी अनिल दररोज आपल्या बॉस बरोबर येत असत. या वेळी अनिलला जेव्हा नीलमच्या मजबुरीच्या गोष्टी समजल्या तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. मग नीलम भिकाऱ्यांच्या लाईनमधून बाहेर येऊन सात जन्मांसाठी त्याची पार्टनर बनली.अनिल हा प्रॉपर्टी डीलरमध्ये ड्रायव्हर आहे आणि त्याचे स्वतःचे घर आहे. त्याला आई-वडिल, भाऊ सर्व आहेत, तर नीलमचे आयुष्य फुटपाथवर भीक मागण्यात गेले होते. तिच्याशी कोणी लग्न करील अशी तिला अपेक्षाही नव्हती. या लग्नात अनिलचा मालक ललता प्रसाद यांचे सर्वात मोठे योगदान होते.

जेव्हा अनिल दिवसा भोजन वाटप करायचा, तेव्हा तो त्यांना नीलमशी बोलायचा. लालतालाही त्याची भावना समजली. यानंतर लालता प्रसादने अनिलच्या वडिलांना लग्नासाठी राजी केले आणि दोघांचे लग्न केले. लालता प्रसाद म्हणाले की, अनिल आमच्याबरोबर अन्नाचे वाटप करायला जायचा, त्यानंतर त्या मुलीच्या तो प्रेमात पडला. अनिलने माझ्याशी याविषयी चर्चा केली तेव्हा मी त्याला रात्रीदेखील भोजन देण्यास सांगितले. मग अनिलने स्वयंपाक करुन स्वत: द्यायला सुरवात केली. यानंतर मी अनिलच्या वडिलांची समजूत काढली, आणि मग दोघांनीही लग्न केले. देवाच्या कृपेने, दोन्ही मुले व मुली आनंदी आहेत.

You might also like