Lockdown : लॉकडाऊनमध्ये भिवंडीत एकावर शस्त्राने सपासप वार करून खून

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचा वेग वाढत असतानाच भिंवडीतील कारीवली तलावाजवळ एका यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा  खून करण्यात आला आहे. मारेकर्‍याने पाठीमागून धारदार शस्त्राने कामगाराचा भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.

अजित स्वयंकांत पटेल (47 रा. बालाजी नगर, कारीवली) असे खून झालेल्या  कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल  भंडारी कंपाऊंड येथे कारखान्यात काम करीत होता. तो सकाळी कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून आलेल्या मारेकर्‍याने त्याच्यावर शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात  खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.