Coronavirus Lockdown : विनाकारण रस्त्यावर फिरणारे चांगलेच ‘गोत्यात’, अवघ्या 4 तासात 300 गाडया पोलिसांकडून जप्त

पोलिसनामा ऑनलाईन टीम –  कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही संचारबंदीतही सांगली शहरात काहीजण फिरत होते. त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चार तासात पोलिसांनी 300 वाहने जप्त केली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सांगलीकरांना घरपोच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा माल आणि भाजीपाला खरेदीसाठी विनाकारण दुचाकी घेऊन बाहेर पडणार्‍यांच्या गाड्या जप्त केल्या जातील असा इशारा सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी दिला होता. तरीही भाजीपाला, किराणा, औषध अशी कारणे सांगून दुचाकी घेऊन बाहेर पडणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही. या इशार्‍यानंतरही काही महाभाग विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने पोलिसांनी आज (31 मार्च) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यास केली आहे. संचारबंदी असूनही काही जण शहरात फिरत असल्याचं पाहून पोलिसांनी प्रत्येक चौकात गाडी अडवून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चार तासात तब्बल 400 गाड्या जप्त केल्या आहेत.