Lockdown 3.0 : राज्यात दीड दिवसात 43. 75 कोटीची मद्यविक्री !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात मद्याची दुकाने गेल्या काही दिवसांपासून बंद होती, मात्र काल पासून ही दुकाने उघडल्यानंतर दीड दिवसात राज्यात तबल 45.75 कोटींची मद्यविक्री झाली आहे. तर 12.50 लाख लिटीर दारू विकली गेली आहे. दरम्यान राज्यातील 9 जिल्ह्यात प्रथमपासूनच दुकाने बंद असून, आता त्यात मुंबईसह 4 शहरांनी कालपासून मद्यविक्री बंद केली आहे. त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात मद्यविक्री झाल्याचे दिसून आले आहे.

देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी 40 दिवसापासून देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू होते.

दरम्यान या लॉकडाऊन काळात मात्र मद्यपींची चांगलीच पंचायत झाली होती. अनेकाकडून मद्याची दुकाने सुरू करावी अशी मागणी केली होती. तर शासनाचा महसूल देखील बुडत होता. यामुळे राज्यात मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा विचार होता. त्यानुसार राज्यात आता सोमवार पासून मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. तसेच स्थानिक प्रशासनास स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार होते.

त्यानुसार राज्यात जवळपास 9 जिल्ह्यात दारू विक्री परवाना स्थानिक प्रशासनाने दिला नाही. मात्र इतर ठिकाणी त्याला परवानगी देण्यात आली. त्यावेळी सकाळपासून अनेक मद्यप्रेमींनी रांगा लावून मद्य खरेदी केली. गेल्या दीड दिवसात राज्यात तबल 12.50 लाख लिटर दारूची म्हणजेच 45.75 कोटींची मद्यविक्री झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ही आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच कोणत्या जिल्ह्यात दारू विक्री सुरू आहे नी कुठे बंद आहे याची देखील माहिती देण्यात आली आहे. यात मोठ्या शहरात मद्यविक्री बंद असल्याने ही मद्यविक्री कमी झाल्याचे मानले जात आहे.

या जिल्ह्यात मद्यविक्री

ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, भडार, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा

या जिल्ह्यात अजूनही मद्यविक्री बंद

सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, गोंदिया

मद्यविक्री सुरू केली पण पुन्हा बंद

मुंबई शहर, मुबंई उपनगर, उस्मानाबाद आणि लातूर