पुण्यात ‘हॉटस्पॉट’ सोडून इतर भागात काही प्रमाणात शिथिलता, ‘ते’ परिसर सीलचं, पाहा यादी आणि जाणून घ्या नियम व अटी (व्हिडीओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर असणाऱ्या पुण्यात पोलिसांनी अतिसंक्रमित परिसर वगळता इतर भागातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. आता नव्या आदेशानुसार या भागात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानासोबतच इतर दुकाने उघडली जाणार आहेत (एका रस्त्यावरील 5 फक्त). तर अतिसंक्रमित असणारा भाग हा सील असणार असून त्याठिकाणी पूर्वी प्रमाणेच निर्बंध असतील, असे देखील जाहीर केले आहे. पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी रात्री उशिरा हे आदेश दिले आहेत.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हॉटस्पॉट भागात पूर्वी प्रमाणे निर्बंध ठेवतानाच उर्वरित ठिकाणच्या दुकानांच्या वेळेत बदल केला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि इतर सेवांची दुकाने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय जीवनावश्यक वस्तू वगळता हद्दीतील इतर पाच दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. त्यात एक दारूचे, एक कडप्याचे, लोखंडी, सोन्याचे, अशी गरजेची दुकाने असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर  घरपोच दुधविक्री सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या आदेशानुसार,  ज्या बांधकामाच्या ठिकाणी मजूरांची राहण्याची सोय आहे त्याठिकााणी काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मान्सुनपुर्व आपत्ती निवारण करताना शासनाकडून करण्यास येणार्‍या विविध कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. मेटृोच्या कामालाही परवानगी देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांकडून पर्यवेक्षण केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  शहरातील कोणेत्याही नागरिकाला सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत भटकंती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उर्वरित इतर अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांची संध्याकाळी सात वाजेआधी घरामध्ये येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सर्वानी सोशल डिसटन्स आणि सुरक्षिततेची साधने वापरावी. त्यामध्ये हॅडग्लोज, चेहरा मास्क, पीपीई कीटचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना घराबाहेर पडू देउ नये. त्यांनी अत्यावश्यक वेळेत घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

हे सुरू आदेशानुसार होणार…

– ज्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असून बाहेरून कामगार आणण्याची गरज नाही अशा प्रकल्पाना  बांधकाम चालू ठेवण्याची परवानगी राहणार आहे.

– मान्सून पूर्व आपत्ती निवारण संबंधित शासनाच्या विविध विभागाकडून करण्यात येणारी कार्यवाही.

– मेट्रो प्रकल्प 

– रॉड गल्ली मधील जीवनवश्यक  वस्तूच्या  विक्रीखेरीज इतर सामग्रीच्या विक्रीची पाच दुकाने चालू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा संबंधित सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रतिबंध क्षेत्र वगळता सुरु ठेवता  येणार आहे.

घरपोच दूध सुविधा सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत राहणार आहे. 

– वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना घरीच ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी निर्देशित केल्या प्रमाणे जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवता येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी दिलेले निर्बंध कायम राहणार आहे. आदेशाचे उलनघन करणाऱ्या व्यक्तीवर १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

‘हे’ भाग असतील पूर्वी प्रमाणे “सील”

शहरातील एकुण 23 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग अतिसंक्रमित आहेत. याठिकाणी अतिरिक्त निर्बन्ध लागू करण्यात आले होते. ते निर्बन्ध तसेच ठेवण्यात आले आहेत. 

1) समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग सील असणार आहे.

2) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ऊत्तर बाजू, शिवाजीनगर काँग्रेस भवनाची मागील बाजू

3) स्वारगेट पोलिस ठाणे परिसरात गुलतेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी, मीनाताई ठाकरे वसाहत, सेव्हन्थ डे ऑडव्हॅनटिस्ट सॊरीसबरी, ढोले मळा झोपडपट्टी

4) लष्कर पोलीस ठाण्यात नवीन मोदीखाना पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भीमपुरा लेन, बाबाजान दर्गा/ क्वार्टर गेट रोड, शिवाजी मार्केट/सरबतवाला चौक रोड, शितलादेवी मंदिर रोड, छावणी परिसर

5) बंडगार्डन भागात ताडीवला रोड, खासगी रस्ता, लुबिना नगर, विश्वदीप तरुण मंडळ,

6) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळजाई वसाहत, धनकवडी, गुलाबनगर-चैतन्यनगर

7) भारती विद्यपीठ परिसरात अंबामाता मंदिर कात्रज आणि जामभुलवाडी-साई समृद्धी भाग

 8) दत्तवाडी भागात पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन, 52 चाळ पर्वती, दांडेकर पुल झोपडपट्टी, दत्तवाडी पर्वती, इंदिरानगर झोपडपट्टी व निलंयम चित्रपट गृह

9) कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जय भवानीनगर, सुतारदरा, केलेवाडी, शिवतारा बिल्डिंग बधाई स्वीट, महाराजा कॉम्प्लेक्स मागे चंद्रगुप्ता सोसायटी

10) सिहंगड भागात तुकाईनगर, महादेवनगर, साईनगर,खराडी वस्ती आणि राजीव गांधी वसाहत

11) येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर गांधीनगर, येरवडा ताडीगुत्ता, येरवडा नागपूर चाळ, वॉर्ड न. 6 येरवडा गावठाण, कामराजनगर

12) खडकी पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर, इराणी वस्ती पाटकर प्लॉट, कामगार आयुक्त कार्यालय परिसर

13) विश्रांतवाडी भागात आदर्श इंदिरानगर-आळंदी रोड, फुलेनगर – आळदी रोड जाधव वस्ती कळस

14) वडगाव शेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक वडगाव शेरी

15) विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरात कालवड वस्ती लोहगाव

16) कोंढवा परिसरात ए.आय.बी.एम रोड प्रभाग 26 तसेच संपुर्ण कोंढवा बुद्रुक परिसर, नोर्टीगहल सोसायटी, कोंढवा बुद्रुक परिसर, कृष्णानगर व महंमदवाडी संपूर्ण परिसर, अशोका म्युज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर, सत्यानंद हॉस्पिटल गल्ली भैरोबा मंदिर पीएमटी बस स्टॉप, संत गाडगे महाराज शाळा,  साई मंदिर, शालिमार सोसायटी, कुमार पृथ्वी गंगाधम रोड, मलिक नगर, होलवस्ती व उंड्रि

17) वानवडी पोलीस ठाणे परिसरात विकासनगर घोरपडी, सयदनगर , रामटेकडी, वॉर्ड न. 24, हंडेवाडी रोड, काळेपडलं रेल्वे गेट ते दुर्गामाता मंदिर ते म्हसोबा मंदिर, ड्रीम्स आकृती सोसायटी, ढेरे मार्केट चिंतामणी नगर हंडेवाडी, प्रभाग क्रं. 26 व 28 आणि रामनगर व गुलामअली नगर तसेच एसआरपीएफ गट क्रमांक 2 परिसर

18) मुंढवा भागात घोरपडी गाव, बी.टी. कवडे रोड, विकासनगर, बाळजीनागर प्रभाग 2 व श्रावस्ती नगर

19) हडपसर पोलीस ठाणाच्या हद्दीत सोलापूर रोड, ज्योती हॉटेलपासून मिरेकर वस्ती कॉनॉलचे उजवीकडील भाग, एच. पी. पेट्रोल पंप, महात्मा फुले वसाहत संपूर्ण परिसर, रेल्वे लाईनकडील इंदिरानगर झोपडपट्टी, डीपी रोड म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा ओढ्याकडील पूर्ण परिसर, माळवाडी परिसर , गोसावी वस्ती, वैदूवादी परिसर आदर्श कॉलनी वेताळवाडी, सातववाडी आणि माळवाडी

20) बिबवेवाडी भागात अप्पर इंदिरानगर, सर्व्हे न. 650 बिबवेवाडी

21) मार्केटयार्ड पोलीस ठाणे परिसरात डॉ. आंबेडकर नगर आणि प्रेमनगर झोपडपट्टी

लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.  पुण्यातील कोरोना हॉटस्पॉटच्या ठिकाणी अतिरिक्त निर्बंध कायम ठेवले आहेत. उर्वरित ठिकाणांवरील निर्बधात थोडी शिथिलता आणली आहे. त्यात कमी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता इतर विविध वस्तूंच्या विक्रीची 5 दुकाने उघडी ठेवण्यात येतील. त्यासाठी हद्दीतील व्यापारी संघटनेचे सहकार्य घेतले जाणार आहे.

डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त