Lockdown 3.0 : ‘कोरोना’चा ‘दारू’ण पराभव करण्यासाठी तळीरामांच्या सकाळपासूनच वाईन शॉपसमोर रांगा (व्हिडीओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करत वाईनशॉप उघडण्यास परवानगी मिळताच सकाळपासून शहरातील काही भागात दारूसाठी रांगांच रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. पण अद्याप तरी वाईनशॉप उघडण्यात आलेली नाहीत त्यामुळे परिसरात तुफान गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा ताण मात्र पोलीस यंत्रणेवर पडत आहे.

पुणे पोलिसांनी रात्री उशिरा नव्या आदेशानुसार शहरातील अतिसंक्रमित भाग सील ठेवत इतर भागातील काही प्रमाणात सूट दिली. अत्यावश्यक सेवा सोबतच वेगवेगळी पाच दुकाने उघडण्यास परवानगी दिली. आता त्यात दारूचे म्हणजेच वाईनशॉपला देखील परवानगी मिळाली आहे. यानंतर सकाळपासूनच अनेक भागात दारू घेण्यासाठी तळीरामानी मोठी गर्दी केली आहे. लांबच्या लांब च रांगा लागल्या असून, तुफान गर्दी झाली आहे. सिहंगड परिसरात आनंदनगर आणि माणिकबाग भागातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मात्र पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.

तर शहरात काही दुकाने उघडणार असे जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी देखील खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना ही शिथिलता दिल्याने मात्र भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

शहरात इतके दिवस काटेकोर पालन केल्यानंतर अचानक अशारितीने नागरिक बाहेर पडल्याने आता या नियम शिथिलतेचा परिणाम काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.