लॉकडाऊनमुऴे 30 % कारागिरच बनवितात श्रींच्या मूर्ती

पुणे : एप्रिल-मे महिन्यामध्ये श्रींच्या मूर्ती बनविण्यासाठी वातावरण चांगले असते. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसतशी कारागिरांकडून श्रींच्या मूर्ती बनविण्याची लगीनघाई सुरू होते. मात्र, कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, यासाठी 22 मार्चपासून लॉकडाऊन श्रींच्या मूर्ती बनविण्याचे काम ठप्प झाले होते. मात्र, ‘लॉकडाउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर हळूहळू आता गणेशमूर्ती कारखाने सुरू होऊ लागले आहेत. कारखान्यामध्ये मूर्ती घडविण्याचे काम करताना तोंडाला मास्क लावून आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा नियम पाळला जात असून, कामगारदेखील तोंडाला मास्क लावतच काम करीत आहे. याशिवाय कारखान्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ ३० टक्केच कामगारांना बोलवले जात आहे.

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. पुणे शहर आणि उपनगरामध्ये गेल्या काही वर्षांत गणेशमूर्ती घडविणाऱ्या कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शहर व उपनगराच्या परिसरामध्ये लहान-मोठ्या स्वरूपांत अनेक कारखाने अस्तित्वात आहेत. पुणे आणि हडपसरमधील कारखान्यांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या मूर्ती इतर राज्यांमध्ये पाठवण्यात येतात. त्यामुळे कारखान्यांमध्ये साधारणपणे डिसेंबर महिन्यापासूनच गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. उन्हाळा सुरू होताच हे काम वेगाने केले जाते. कारण दुसऱ्या शहरांसोबतच दुसऱ्या राज्यांमध्येही मूर्ती पाठवण्यास ऑगस्ट महिन्यापासूनच सुरुवात केली जाते. त्यापूर्वीच मूर्तींचे काम पूर्ण व्हावे, यासाठी उन्हाळ्यात कामाचा वेग वाढवण्यात येतो. यंदा मात्र ‘लॉकडाउन’मुळे तब्बल 5५ दिवसांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम ठप्प होते.

‘लॉकडाउन’मुळे बंद ठेवलेले गणेशमूर्ती घडविणारे कारखाने तब्बल 55 दिवसांनी हळूहळू सुरू होऊ लागले आहेत. मूर्ती घडवताना कारखान्यात काम करणारे कामगार तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’ या नियमाचे पालन करीत मास्कचा वापर करीत आहेत. तसेच कारखान्यांमध्ये एकाचवेळी कामगारांची गर्दी होऊ नये, यासाठी कामगारांना कारखान्यात येण्याच्या वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत.

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ‘लॉकडाउन’ सुरू झाला आहे. त्यामुळे शहर व परिसरात असणारे गणेशमूर्ती घडविणारे कारखानेसुद्धा बंद करण्यात आले होते. साधारणपणे मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांमध्ये वर्षभर तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींपैकी २० ते २५ टक्के मूर्ती तयार करण्यात येत असतात. परंतु, तब्बल दीड महिना कारखाना बंद असल्यामुळे श्रींच्या मूर्ती बनविण्याचे कामही थांबले आहे. ‘लॉकडाउन’मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर हळूहळू आता गणेशमूर्ती कारखाने सुरू होऊ लागले आहेत. कारखान्यामध्ये मूर्ती घडविण्याचे काम करताना ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा नियम पाळला जात असून कामगारदेखील तोंडाला मास्क लावतच काम करीत आहे. याशिवाय कारखान्यांमध्ये फक्त ३० टक्केच कामगारांना बोलवले जात आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. तसेच कारखान्यात असणाऱ्या एकूण कामगारांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले असून, त्यांना कारखान्यात येण्याचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे.

कच्च्या मालाची समस्या

लॉकडाऊनमुळे वाहतूक यंत्रणाही सुरळीत नाही. त्यामुळे गणेशमूर्ती कारखाने हळूहळू सुरू होत असले, तरी कारखानदारांना कच्च्या मालाची समस्या जाणवू लागली आहे. गणेशमूर्ती रंगवण्यासाठी रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस, असा कच्चा माल सध्या ‘लॉकडाउन’मुळे सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे सध्या तरी आहे त्या कच्च्या मालाचा उपयोग करून मूर्ती घडविण्याचे काम सुरू आहे.

हडपसर (हांडेवाडी) येथील श्रींच्या मूर्ती बनविणारे अक्षय दिलीप निघोल म्हणाले की, ‘लॉकडाउन’मुळे कारखाने जवळपास दोन महिने बंद होते. आता सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत हळूहळू कारखाने सुरू करीत आहोत. सध्या कच्चा माल इतर शहरातून, राज्यातून येण्यास अडचणी आहेत. या सर्वांचा परिणाम उत्पादनावर होत आहे. मात्र, गणेशभक्तांची कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

You might also like