Lockdown 4.0 : पुणे महापालिकेची नियमावली जाहीर, घरकाम करणार्‍यांना परवानगी पण….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं 31 मे पर्यंत संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान, राज्य सरकारनं आज (मंगळवारी) दुपारी लॉकडाऊन 4.0 बाबतची नियमावली जाहीर केली. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी महापालिकेकडून लॉकडाऊनबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर राहणार्‍या घरकाम करणार्‍या व्यक्तींना घरकामास जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिबंधित (कंटेंमेंट झोन) क्षेत्राच्या बाहेर राहणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, घरी मालकाची इच्छा असल्यास स्वच्छेने काम करता येणार आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात राहणार्‍या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी घरकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच घरकाम करणार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक संदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे. शहरातील इतर व्यवसाय तसेच कार्यालये याबाबत सविस्तर आदेश जाहीर करण्यात आला आहे.