अतिशय वाईट होता लॉकडाऊनचा चौथा टप्पा, दर तासाला सरासरी 271 लोक झाले ‘कोरोना’बाधित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास लॉकडाउनचा हा टप्पा खूप वाईट होता. यावेळी, दर तासाला कोरोनाचे सरासरी 271 नवीन रुग्ण समोर आले आहेत. गेल्या एका आठवड्यात, दररोज नवीन कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आता भारतात एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 वर पोहोचली आहे. दरम्यान, 16 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपला. त्यावेळी देशातील एकूण रुग्णांची संख्या 90,927 होती. पण आता एकूण रूग्णांची संख्या वाढून 1,82,142 झाली आहे. म्हणजेच लॉकडाउन 4 मध्ये रुग्णांची संख्या दुप्पट झाली.

गेल्या 6 दिवसांत प्रकरणांत वाढ
लॉकडाउनमधील शेवटचे 6 दिवस खूप वाईट होते. 24 मे रोजी 6767 नवीन रुग्ण समोर आले. 25 मे रोजी ते 6977 पर्यंत वाढले. 28 मे रोजी ते 7466 वर पोहोचले, शनिवारी हा आकडा 7965 होता तर रविवारी यात विक्रमी वाढ होत 8380 नवीन प्रकरणे आढळली. .

रिकव्हरी रेटमध्ये वाढ
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटही सतत वाढत आहे. भारतात रिकव्हरी रेट 47.75 वर पोहोचला आहे. जेव्हा देशात पहिला लॉकडाउन सुरू झाला त्यावेळी रूग्णांच्या रिकव्हरी रेट 7.1% होता. दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये तो 11.42% पर्यंत पोहोचला. यानंतर ते आणखी वाढले आणि दर 26.59 टक्क्यांवर पोहोचला. 18 मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला तेव्हा हा आकडा 38% पर्यंत पोहोचला होता.

रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ
देशात रविवारी एका दिवसात कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण नोंदले गेले असून त्यानंतर संक्रमणाची एकूण प्रकरणे वाढून 1,82,143 झाली आहेत, तर मृतांचा आकडा 5,164 झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते देशातील 89,995 लोकांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर 86,983 लोक बरे झाले आहेत आणि एक रुग्ण परदेशात गेला आहे. आतापर्यंत सुमारे 47.75 टक्के रुग्ण निरोगी झाले आहेत.