Lockdown 5.0 : राज्यात काय चालू अन् काय बंद राहणार हे ठाकरे सरकारनं सांगितलं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरुवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सुरु करण्याची परवानगी दिली होती. आता रेड झोनमध्ये येणाऱ्या माहापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील रेड झोन
मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टी आता टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ‘या’ गोष्टी सुरु होणार
मिशन बीगिन अगेनचा पहिला टप्पा 3 जूनपासून सुरु होणार आहे. यामध्ये अनेक गोष्टी सुरु होणार आहेत.
1. सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील
2. बीच, सरकारी-खासगी मैदानं, सोसायट्यांची मैदानं, गार्डन इत्यादी ठिकाणी व्यायमाला परवानगी. पण हे केवळ सकाळी 5 ते संध्याकाळी 7 याच काळात. समूहाने कोणतीच कृती करता येणार नाही. लहान मुलांसोबत एका मोठ्या व्यक्तीला राहता येईल.
3. प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरुवात करता येणार.
4. गॅरेज सुरु करता येणार. पण गाडी दुरुस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लगेल.
5. अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयामध्ये 15 टक्के किंवा कमीतकमी 15 कर्मचाऱ्यांवर काम सुरु करता येईल.

दुसरा टप्पा 5 जूनपासून सुरु, या गोष्टी सुरु होणार काय बंद राहणार
हा दुसरा टप्पा 5 जूनपासून सुरु होणार आहे. यामध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
1. 5 जूनपासून सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी. मात्र मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल यांना परवानगी नाही. परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे P1 आणि P2 असा. परंतु त्यांना केवळ 9 ते 5 याच वेळेत दुकाने सुरु ठेवता येतील.
2. कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुम वापरण्यास परवानगी नाही. मात्र कोणत्याही प्रकारचे कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करण्यास परवानगी.
3. लोकांनी दुकानावर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्या दुकानांचा वापर करावा.
4. टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी केवळ आवश्यक प्रवासाठी चालक + 2, दुचाकीवर केवळ चालक

पुढील सूचना येईपर्यंत ‘या’ गोष्टी बंदच राहणार
1. धार्मिक स्थळ बंद राहणार
2. स्टेडियम बंदच राहणार
3. लांबच्या प्रवासावर बंदी
4. शाळा, कॉलेज महाविद्यालये, कोचिंग क्लास बंदच राहणार
5. मेट्रो बंदच राहणार
6. सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील
7. सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मोनरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्यालयाचे हॉल,
8. सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणारे कार्यक्रम बंदच राहणार
9. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट बंदच राहणार
10. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.