आता लॉकडाऊन उघडा ! ‘फक्त शाळा-कॉलेज बंद ठेवा’, मोदी सरकारला जाणकारांनी सूचवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूमुळे लागू केलेला लॉकडाऊन 4.0 चा कालावधी संपत आला आहे. दरम्यान, आता 1 जूनला लॉकडाउन 5 लागू होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यापूर्वी कोविड टास्क फोर्सच्या दोन पॅनेलने लॉकडाऊनबाबतचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला सादर केला होता. ज्यामध्ये लॉकडाऊन उघडण्याबद्दल सूचना दिल्या गेल्या होत्या. कोविड टास्क फोर्सच्या दोन पॅनेलचे प्रमुख सी.के मिश्रा आणि डॉ. व्ही.के पॉल आहेत. दोन्ही पॅनेलांनी लॉकडाउन 4.0 मधून कसे बाहेर पडायचे याबद्दल एक अहवाल दिला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनला हटवले जाऊ शकते असे सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे, परंतु शाळा-कॉलेज-मॉल-धार्मिक स्थळ यासारख्या जागा सध्या बंद ठेवणे योग्य आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्याशिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहे त्या जिल्ह्यांमध्ये सक्ती वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. तथापि, आत्तापर्यंत या फक्त पॅनेलच्या सूचना आहेत. अंतिम निर्णय गृह व आरोग्य मंत्रालय घेईल. मार्चमध्ये गृह मंत्रालयाने 11 पॅनेल्स तयार केले होते, ज्यांचे काम लॉकडाऊन संदर्भात अहवाल तयार करण्याचे काम होते.

विशेष म्हणजे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 5 बाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घ बैठक घेतली. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या बैठकीत 31 मे नंतरच्या रणनीतीवर चर्चा झाली. गुरुवारी अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून लॉकडाऊनबाबत आपले मत विचारले होते. 24 मार्चला देशात प्रथम लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, त्यानंतर आता जवळपास 70 दिवस झाले आहेत आणि देशात लॉकडाऊन आहे. तथापि, आताही बर्‍याच राज्यांनी त्यांच्या वतीने लॉकडाऊन वाढविले आहे किंवा ते वाढवण्याची शिफारस केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like