Lockdown Again In Pune : सोमवारी (13 जुलै) रात्री 12 वाजल्यापासून शहरात कडक ‘लॉकडाऊन’, पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात उद्यापासून (सोमवारी रात्री) बारा वाजल्यापासून कडेकोट लॉकडाऊन असणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी आज मध्यरात्रीपासून शहर बंद राहणार असल्याच्या समाजातून दिवसभर खरेदीसाठी तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळाले. परंतु उद्याचा दिवस नागरिकांना खरेदीसाठी असणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुढील दहा दिवस (13 ते 23 जुलै) कडेकोट लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी अचानक देशात आणि राज्यात लॉकडाऊन केल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. नागरिकांनी खरेदी करण्यास तुफान गर्दी केली होती. त्यातून चांगलाच गोंधळ उढाला होता. याच फायदा घेत शहरात अत्यावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री झाली होती.

दरम्यान शहरातील संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. पण यावेळी तो अनुभव असल्याने शासनाने तीन दिवस आधी जाहीर केले आहे. मात्र तरीही नागरिकांमध्ये लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून की उद्यापासून यात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. त्याचा परिणाम गर्दी होण्यास झाला. पण लॉकडाऊन उद्यारात्री 12 वाजल्यापासून होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना उद्याचा दिवस असणार आहे.

शहरात सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडत असताना सर्व नियम पाळावे. मास्कचा वापर करावा.

बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा