ठाणे अन् कल्याण-डोंबिवलीत संपूर्ण ‘Lockdown’ जाहीर, ‘हे’ नियम पाळावे लागणार

पोलीसनामा ऑनलाइन – पुनश्च हरिओम म्हणत राज्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली. त्यावेळी राज्य अनलॉकच्या दिशेने जात असताना दुसरीकडे मात्र काही ठिकाणी कोरोना संसर्गाचा प्रसार कमी झालेला नाही. त्यामुळे तिथे पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात १० दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.

१. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन जाहीर करण्यासोबत नियमावलीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. अन्यथा त्यांना कारवाईला समोर जावं लागू शकत.

२. वैद्यकीय सेवेसाठी आपत्कालीन प्रवासाच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच खासगी वाहनांत चालकाशिवाय केवळ एका प्रवाशाला परवानगी असेल.

३. परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा आणि या आदेशांतर्गत कृतींकरिता परवानगी दिली आहे.

३. घरी विलगीकरणात असलेल्या नागरिकांनी नियमांचा भंग केला तर, संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच त्यांचे पालिका विलगीकरण कक्षात स्थलांतर केले जाईल.

४. सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स या अत्यावश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटीला परवानगी असेल. व्यावसायिक आस्थापना कार्यालये, कारखाने, गोदाम यासह सर्व दुकान बंद असतील. डाळ व तांदूळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या अत्यावश्यक वस्तुंच्या उत्पादनाची युनिट्स चालवण्यास परवानगी असेल.

५. सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह चालविण्यास परवानगी असेल. तिथे तीन फूट सामाजिक अंतर पालन आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक असेल.

६. मद्य विक्रीची दुकाने केवळ घरपोच सेवेस परवानगी असणार आहे.

७. जे उद्योग युनिट सुरु आहेत, ते तसेच सुरु राहतील.

८. लग्न सोहळ्यासाठी ५० व्यक्तींच्या संख्येस मुभा असणार आहे.

९. सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व नियोजित शस्त्रक्रिया करण्यात याव्यात.

१०. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु असतील. दूध विक्रीची दुकानं पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत सुरु ठेवून विक्री करता येईल.

११. मेडिकल स्टोअर्स, रुग्णालय, दवाखाने, गॅस सिलेंडर पुरवठा, उद्ववाहन दुरुस्ती यांच्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही.

१२. अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तुंच्या ने-आण कारण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे.

१३. इंटरसिटी, एमएसआरटीसी बस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांची वाहतूक बंद. टॅक्सी, रिक्षा यांची प्रवासी सेवा बंद असेल.

१४. सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खासगी वाहनांसह) तसेच खासगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद. बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवासी वाहनांना परवानगी असेल.

१५. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींशिवाय खरेदीसाठी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध आहे.

तर प्रिंट आणि इलेक्टॉनिक माध्यमे, आय.टी आणि आयटीईएस, बँका, विमा आणि संबंधित बाबी, एटीएम, टेलिकॉम, टपाल ,इंटरनेट, डाटा सेवा, पुरवठा साखळी, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि उपलब्धता, कृषी वस्तू, उत्पादने, सर्व वस्तूंची निर्यात आणि आयात. अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तुंचे ई-कॉमर्स वितरण, पेट्रोल पंप, रुग्णालये, फार्मेसि आणि ऑप्टिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल्स उत्पादन त्याचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक, एलपीजी गॅस, तेल एजन्सी व त्यांची गोदामे, त्यांच्याशी संबंधित वाहतूक आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील पासधारक, सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन, खासगी आस्थापना, आवश्यक सेवा आणि कोविड-१९ नियंत्रणासाठी सहकार्य करणाऱ्या सेवा यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमधून वगळण्यात आलं आहे.