Lockdown : 3 आठवडयांपासून एकाच ठिकाणी अडकलाय ‘भाईजान’ सलमान खान, मोठया शौर्यानं सांगितलं – ‘आम्ही घाबरलोय’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनामुळं देशातील आणि राज्यातील स्थिती अजूनच खराब होत चालली आहे. आजही लोकांना सांगितलं जातं की, घराच्या बाहेर पडू नका. कलाकारही लोकांना आपापल्या पद्धतीनं जागरूक करताना दिसत आहेत. अभिनेता सलमान खान यानंही नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं सांगितलं आहे की तो किती घाबरला आहे.

सलमान खाननं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात समलान खानचा भाऊ सोहेलचा मुलगा आणि त्याचा पुतण्या निर्वान दिसत आहे. व्हिडीओत सलमान खान म्हणतो, “जो डर गया वो मर गया हा डायलॉग तुम्हाला आठवतो का. तो इथं लागू होत नाहीये. त्यामुळं जास्त ब्रेव बनू नका. आम्ही मोठ्या धैर्यानं सांगत आहे की, आम्ही घाबरलोय.” सोहेलचा मुलगा निर्वान म्हणतो, “घरात राहण्यातच शहाणपण आहे. कुणाशीही संपर्क टाळा. जेवढं जास्त आपण घरात राहू. तेवढंच लवकर आपण यातून बाहेर पडू आणि सगळं ठिक होईल.” सलमान खान म्हणतो, 3 आठवडे झाले आहेत आणि दोघांनीही आमच्या वडिलांना पाहिलेलं नाही. जो डर गया वो बच गया.

सलमान सध्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. लॉकडाऊनच्या आधीच तो इथं आला होता. यानंतर तो घरी नाही जाऊ शकला. सलमान आणि निर्वाणचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

कोरोनाबद्दल बोलायंच झालं देशात या व्हायरसमुळं अद्याप 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. 4067 लोक या जावघेण्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सुरक्षेसाठी देश 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊनमध्ये लागू केला आहे.