Lockdown मध्ये मिळणार नाही दारू-सिगरेट, असा करा ‘विदड्रॉल सिम्पटम्स’चा ‘सामना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. आवश्यक वस्तू वगळता मॉल आणि दारूची दुकाने बंद आहेत. अशा वातावरणात, दारू, सिगारेट किंवा गांजाचे नियमित सेवन करणाऱ्या लोकांसमोर मोठी समस्या उद्भवली आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की अचानक दारू सोडणे सोपे नाही. या प्रकरणात, शरीरात विदड्रॉल सिम्पटम्स दिसणे सामान्य आहे. नॅशनल ड्रग डिपेंडेंस ट्रीटमेंट सेंटर एम्सचे प्रा. डॉ. अतुल आंबेकर यांनी एका वृत्तसमूहाशी संवाद साधताना लॉकडाऊन दरम्यान दारू व सिगारेट व्यसन असेल आणि त्यांना बऱ्याच काळापासून ते नाही मिळाले तर काय करावे याबद्दल सांगितले.

डॉ आंबेकर म्हणाले की, देशभरतील मानसोपचार तज्ज्ञांकडून अशी माहिती मिळते आहे की त्यांच्याकडे असे रुग्ण येत आहेत ज्यांना दारू मिळाली नसल्यामुळे विदड्रॉल सिम्पटम्स येत आहेत. त्यांनी सांगितले की अचानक दारू न मिळाल्यामुळे अशी समस्या उद्भवणे सामान्य आहे.

मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही वैद्यकीय सहाय्याशिवाय अचानक दारू न मिळाल्यामुळे विदड्रॉल सिमप्टम्स धोकादायक पातळीवर जाऊ शकते. अशा लोकांना औषधांची नितांत आवश्यकता असते. डॉक्टरांचे औषध न मिळाल्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

जेव्हा सरकारने संपूर्ण देशाला लॉकडाऊन केले आहे, अशा परिस्थितीत परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक बनली आहे. डॉ.अंबेकर म्हणतात की, दररोज दारूचे व्यसन असलेल्या लोकांना दारू न मिळाल्यास पूर्ण वैद्यकीय सहाय्य मिळावे हे सरकारने सुनिश्चित केले पाहिजे. विदड्रॉल सिमप्टम्स कव्हर करण्यासाठी त्यांच्यासाठी औषधे उपलब्ध असावीत.

निकोटीन सोडल्यानंतर ही लक्षणे दिसतील ,घाबरू नका

डॉ. आंबेकर म्हणाले की, फक्त दारूच नव्हे तर निकोटीन सोडल्यास चिंता, अस्वस्थता, डोकेदुखी, थकवा, दु: ख, सुस्तपणा, चिडचिडेपणा यासारखी अनेक लक्षणे उद्भवू शकतात. पाणी, व्हिटॅमिन सी इत्यादी घेऊन दोन ते तीन दिवसांत या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. जेव्हा ही लक्षणे अधिक असतात, तेव्हा मानसोपचार तज्ञांकडे जा. परंतु त्याच्या लक्षणांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

मद्यपान करणार्‍यांना सल्ला

ज्या लोकांना अल्कोहोलचे व्यसन आहे आणि त्यांना अल्कोहोल मिळत नाही अशा लोकांच्यात विदड्रॉलची लक्षणे निश्चितच असतील. अशा परिस्थितीत लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की केवळ तल्फ असेल तर इतर काही कामात आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. परंतु जेव्हा ही लक्षणे शारीरिक असतात तेव्हा त्वरित मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या.

दारू सुटल्यानंतर ही लक्षणे जास्त प्रमाणात असतील तर डॉक्टरना भेटा

–हात थरथरणे
–काळजी वाटणे
–धाप लागणे
–चक्कर,उलटी येणे
–इंसो‍मेनिया म्हणजे निद्रानाश
–मतिभ्रम

घरीच करा नियंत्रण

शांत वातावरणात एकटे रहा आणि आपल्या आवडीचे काम करा. द्रव आणि व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करा. यात महत्वपूर्ण भूमिका व्यसनी लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तींची आहे. अशा व्यक्तींनी देखील व्यसनी व्यक्तीचे काउंसिलिंग करावे.