‘कोरोना’ची दहशत ! वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी मुलीला मिळाले फक्त 3 मिनीट, कारण जाणून व्हाल ‘भावुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात गेल्या २४ तासांत कोरोनाची आतापर्यंत ९,८५१ नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात एकूण संक्रमितांची संख्या २,२६,७७० आणि मृतांची संख्या ६,३४८ वर पोहोचली. तर एकीकडे मणिपूरच्या इम्फाळमध्ये एक भावनिक घटना घडली, जिथे मुलीला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना पाहण्यासाठी फक्त तीन मिनिटे दिली गेली.

मुलगी कोरोना संशयित आढळली

एक २२ वर्षांची अंजली मांगटे नावाची मुलगी कोरोना संशयित आढळली. ती क्वारंटाइन केंद्रात राहत आहे. दुसरीकडे मुलीच्या वडिलांचा दीर्घ आजारानंतर मृत्यू झाला. मुलीला इम्फाळहून कांगपोकपी येथे आणले गेले. आपल्या वडिलांना अखेरचे पाहण्यासाठी तिला तीन मिनिटे मिळाली होती. जेव्हा कोरोना पीडित मुलीने तिच्या वडिलांना अखेरचे पाहिले तेव्हा ती खूप रडली. कोरोना संशयित असल्यामुळे तिची आई आणि इतर नातेवाईक तिच्या जवळ जाऊ शकले नाहीत. यादरम्यान डॉक्टर स्टॉपवॉचवर लक्ष ठेवून होते. वडिलांच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाने तिला पीपीई किट घालून तेथे जाण्यास परवानगी दिली होती.

देशात १,१०,९६० संक्रमितांचे उपचार चालू आहेत

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात १,१०,९६० संक्रमित रूग्णांवर उपचार चालू आहेत आणि १,०९,४६१ लोक बरे झाले आहेत आणि एक रुग्ण देशाबाहेर देखील गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत ४८.२७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमणाची पुष्टी असलेल्या प्रकरणांत परदेशी नागरिक देखील आहेत. गुरुवारी सकाळपासून आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील १२३ महाराष्ट्रातील आहेत.