‘कोरोना’मुळे घरूनच TV रिपोर्टिंग करत होती मुलगी, तेव्हाच मागून येणाऱ्या वडिलांनी केलं ‘लज्जास्पद’ कृत्य, (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. वर्क फ्रॉम होमची सर्वात मोठी समस्या म्हणजे घरातील डिस्टरबेंस. घरी असताना असे काहीतरी घडते ज्याने आपले लक्ष विचलित होत असते. याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे आपल्या घरातूनच टीव्ही रिपोर्टिंग करणाऱ्या एका मुलीच्या मागून अचानक शर्ट न घालताच तिचे वडील येतात.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडा येथील जेसिका लैंग नावाच्या टीव्ही न्यूज रिपोर्टरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यात दिसू शकते की जेव्हा ती घराच्या स्वयंपाकघरात उभे राहून व्हिडीओ शूट करत होती, तेव्हा तिचे वडील विना शर्टचे कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसतात. तिचे वडील टीशर्ट घालत असतानाच स्वयंपाकघरात येतात. वडिलांना असे स्वयंपाकघरात येताना पाहून जेसिका ओरडते – ‘बाबा!’ व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.